पीएम्इंडिया
सक्रिय प्रशासन आणि तत्पर अंमलबजावणीसाठीचा बहुउद्देशीय मंच “प्रगती”च्या नवव्या संवादाच्या अध्यक्षपदावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.
सीमाशुल्क आणि अबकारी कराशी संबंधित जनतेच्या तक्रारी आणि हरकतीबाबत पंतप्रधानांनी कठोर भूमिका घेत, संबंधित अधिकाऱ्यांविरुद्घ कडक कारवाईचे आदेश दिले. ज्या विभागांचा जनतेशी व्यापक संबंध येतो, त्या विभागांच्या सचिवांनी जनतेच्या तक्रारींची देखरेख करण्यासाठी उच्चस्तरीय यंत्रणा तातडीने निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
रस्ते, रेल्वे, कोळसा, वीज आणि नवीकरणीय ऊर्जा, या क्षेत्रात महाराष्ट्र, हरियाणा, उत्तरप्रदेश, हिमाचलप्रदेश, झारखंड, पश्चिमबंगाल, ओदिशा, छत्तीसगड, राजस्थान यासारख्या विविध राज्यातल्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत घेतला.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉर, अलाहाबाद ते हल्दिया दरम्यानचा जलमार्ग विकास प्रकल्प या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावाही त्यांनी घेतला.
उदय अर्थात उज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजनेचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला.
राष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजनेचा आढावा घेऊन लाभार्थींना त्यांचे पैसे वेळेवर मिळण्याऱ्या गरजेवर त्यांनी भर दिला.
N. Chitale / S. Tupe / M. Desai
Issues discussed during today's PRAGATI interaction include progress of UDAY & implementation of National Old Age Pension Scheme.
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2016
Discussions were held on significant projects like Mumbai Trans-Harbour Link, DMIC & Jal Marg Vikas Project from Allahabad to Haldia.
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2016
Also called for top-level monitoring of people's grievances relating to the customs and excise sector. https://t.co/iKKdowfvBx
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2016