Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रणेते नवोन्मेषकार आणि उद्योगपती टीपीजी नंबियार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला


नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रणेते नवोन्मेषकार आणि उद्योगपती टीपीजी नांबियार जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. टीपीजी नांबियार जी भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे प्रबळ समर्थक होते, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:

“श्री टीपीजी नांबियारजी हे एक प्रणेते नवोन्मेषकार आणि उद्योगपती होते.  भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे ते प्रबळ समर्थक होते. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो.”

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai