Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रतिभेला पुरेसा वाव मिळवून देण्यासाठी योग्य वातावरण, मार्गदर्शन आणि संगोपनाचे महत्त्व अधोरेखित करणारे ‘संस्कृत सुभाषित’ पंतप्रधानांनी केले सामायिक


नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिभेला पुरेसा वाव मिळवून देण्यासाठी योग्य वातावरण, मार्गदर्शन आणि संगोपनाचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित आज सामायिक केले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

“खऱ्या प्रतिभेला जेव्हा सकारात्मक वातावरण उपलब्ध होते तेव्हा तिच्यामध्ये अद्भुत ऊर्जेचा संचार होतो. यामुळे जिथे प्रयत्नांमध्ये यश मिळते, तिथेच जीवनाचे देखील सार्थक होते.

पात्रविशेषे न्यस्तं गुणान्तरं व्रजति शिल्पमाधातुः।

जलमिव समुद्रशुक्तौ मुक्ताफलतां पयोदयस्य॥”

एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे मूल्य किंवा मोठेपण हे त्यांना मिळणारे वातावरण आणि मार्गदर्शनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. ज्याप्रमाणे पाण्याचा एक सामान्य थेंब शिंपल्यात प्रवेश केल्यावर त्याचा मौल्यवान मोती बनतो, त्याचप्रमाणे योग्य जागा, पाठबळ आणि संगोपन मिळाल्यास सामान्य गुणही असाधारण बनू शकतात.

 

* * *

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai