पीएम्इंडिया
आज 2 ऑक्टोबर आहे, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या दोन महापुरुषांचे पुन:स्मरण, मात्र आज प्रवासी भारतीय केंद्राचे लोकार्पण होत आहे. हे खूपच सुसंगत आहे की आपण ते 2 ऑक्टोबर रोजी करत आहोत. महात्मा गांधी भारत सोडून गेले होते. मात्र या देशाची साद त्यांना परत घेऊन आली आणि जगभरात पोहोचलेल्या कोणत्याही भारतीयांसाठी घटनेपेक्षा मोठी कोणती प्रेरणा असूच शकत नाही ही एक अशी घटना आहे. जी जगभरात विखुरलेल्या भारतीय समुदायाला भारताशी जोडण्याचा अर्थ काय आहे, आपले हे बंध कसे आहेत याची जाणीव करून देते.
वर्षानुवर्षे आपण पाहत आलो आहोत, एकच शब्द ऐकत आलो आहोत, की आपले लोक शिकून सवरून तयार होतात, परदेशात जातात. ब्रेन ड्रेन हे शब्द आपण ऐकत आलो आहोत. मात्र जगभरातील भारतीय समुदायाला केवळ संख्येच्या स्वरुपात नाही, तर शक्तीच्या स्वरुपात पाहिले तर ही ब्रेन ड्रेनची आपली जी चिंता होती, तिला ब्रेन गेनमध्ये परिवर्तीत करता येऊ शकते.
नदीमध्ये पाणी खूप वाहत असते. मात्र जर कोणी धरण बांधले, वीज निर्मिती केली तर तेच पाणी एका नवीन शक्तीचे स्रोत बनते. जगभरातील भारतीय समुदायात देखील सार्थकता आहे. एखादी अशी यंत्रणा आवश्यक आहे, जी त्या ऊर्जेचे रुपांतर करून देशात प्रकाश पसरवण्यासाठी उपयोगात आणू शकेल. जेव्ही निती आयोगाची रचना झाली, तेव्ही निती आयोगाने आपली प्रमुख कामे लिहिली आहेत, त्यात एके ठिकाणी आणि बहुधा भारताच्या दस्तावेजांमधील हे पहिले असे दस्तावेज असेल, ज्यामध्ये अनिवासी भारतीयांचे सामर्थ्य स्वीकारण्यात आले आहे. जगभरात अंदाजे पावणेतीन कोटी लोक मूळ भारतीय आहेत किंवा ते अनिवासी भारतीय आहेत. आणि जगभरातील सुमारे दीडशेहून अधिक देशांमध्ये कधी कधी आपले अभियान पोहोचले असेल किंवा नसेल, मात्र कुणी ना कुणी अनिवासी भारतीय नक्कीच पोहोचला आहे.
अनेक देश असे आहेत जिथे अभियानाच्या ताकदीपेक्षा अनेक पट ताकद अनिवासी भारतीयांची आहे. अनेक अभियान असे आहेत जे मोठ्या कौशल्याने आपला कारभार चालवत आहेत. त्या अभियानाचे प्रमुख अनिवासी भारतीयांची ताकद ओळखतात, आणि ते सतत वर्षभर त्या देशात अनिवासी भारतीयांना जोडून भारताची भूमिका पोहोचवण्यासाठी मोठ्या खुबीने काम करत आहेत. असे छोटे-छोटे प्रयत्न सातत्याने सुरूच असतात. मात्र आता याचा एक संघटीत शक्ती म्हणून आपण कसा वापर करायचा यासाठी प्रयत्न आहे.
भारताप्रति कुतूहल वाढले आहे, जगाचे भारताप्रती आकर्षण वाढले आहे. अशावेळी अनोळखी भीती हा खूप मोठा अडसर ठरू शकतो. आणि ही जी अनोखी भीती आहे, ती दूर करण्याची ताकद जर कुणात आहे तर ती जगभरातील भारतीय समुदायामध्ये आहे. त्या देशातील व्यक्तीमध्ये आहे. तो सांगेल अरे बाबा, चिंता करू नकोस, मी तिथलाच आहे. एकदा जर त्याने सांगितले की मी तिथलाच आहे, की मग विश्वासाची पातळी एवढी वाढते आणि मग ती अनोळखी भीती देखील नाहिशी होते.
जर त्याने विचारले की तुम्ही कधी गेला होतात, तर तो थोडा अडचणीत येऊ शकेल. मात्र जर विचारले नाही, तर त्याला खात्री पटेल की, हो, हे सद्गृहस्थ मला भेटले आहेत, हे तर भारतातले आहेत, तर ठीक आहे. मी देखील जाऊ शकतो.
जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायाबाबत जगामध्ये जे कुतूहल निर्माण झाले आहे, जगभरात जे आकर्षण निर्माण झाले आहे, त्यासाठी खूप मोठे बी जर कुणी पेरु शकते, अभियानापेक्षाही अधिक जर कुणी त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवेल, तर तो आहे आपला भारतीय समुदाय आणि म्हणूनच आपल्यासाठी गरजेचे आहे की, सर्वप्रथम आपण जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायाशी आपल्याला जोडून घ्यायला हवे, जोडून घेणं महत्त्वाचे आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांनी खूप छान सुरुवात केली होती. प्रवासी भारतीय दिवस साजरा करणे सुरू केले. अन्य सरकारांनी देखील ते सुरू ठेवले आणि प्रवासी भारतीय दिवसाच्या माध्यमातून अभियानाचे देखील लक्ष केंद्रीत झाले की, माझ्या अनेक कामांमध्ये हे देखील एक महत्त्वपूर्ण काम आहे आणि त्यामुळे अनिवासी भारतीयांना जाणीव व्हायला लागली की, आता जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात का असू, मात्र आपल्यासाठी कुठेतरी जागा आहे, आपला विचार करणारे कुणीतरी आहे.
गेल्या दोन वर्षात आपण पाहिले असेल की मानवेतच्या मुद्यांवर भारताने खास करून भारताच्या परराष्ट्र विभागाने आपली एक प्रतिष्ठा संपादन केली आहे. एखाद्या देशात वीस-पंचवीस देशांचे लोक अडकले असतील, त्यामध्ये भारतीय समुदायातील लोक असतील. यातील मोठ्यातले मोठे देश सर्वप्रथम भारतीय दूतावासाशी संपर्क साधतात की, आमचे लोक तिथे अडकलेले आहेत. तुमचा देश नक्कीच काहीतरी करत असेल. आमच्या लोकांचीही सुखरूप सुटका करा आणि जगभरातील 80 पेक्षा अधिक देश असे असतील, ज्यांना गेल्या दोन वर्षात भारतीयांबरोबरच संकटातून वाचवण्याचे मोठे काम परराष्ट्र विभागाच्या नेतृत्वाखाली भारताने केले आहे. नेपाळमध्ये भूकंप आला. त्या भूकंपानंतर आम्ही आपल्या भारतीय बांधवांची चिंता करू शकत होतो. मात्र, आम्ही असे केले नाही. आम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून ज्यांची-ज्यांची मदत करू शकत होतो, त्या सर्वांना मदत पोहोचवली. संकट येमेनचे असो किंवा मालदीवचे असो, मानवता हाच आमचा मध्यवर्ती प्रेरणा स्वभाव आहे आणि त्याच अनुषंगाने ज्या गोष्टींसाठी जगातील काही देशांची जागीर मानली जायची, आज भारताला देखील मानवतेच्या मुद्यांवर योगदान देणारा एक प्रमुख देश म्हणून जगाला दखल घ्यावी लागत आहे आणि ते केवळ शब्दांमुळे नाही, केवळ आपल्या महान सांस्कृतिक वारशामुळे नाही, केवळ आपल्या भव्य इतिहासामुळे नाही तर आपल्या सध्याच्या घटनांमुळे हे संभव झाले आहे. ते तर होतंच होतं. मात्र घटनांमुळे, भारत सरकारच्या सध्याच्या व्यवहारामुळे हे म्हणणे लोकांच्या पचनी पडत नाही.
आपण कल्पना करू शकतो, पहिल्या जागतिक युध्दाची, दुसऱ्या जागतिक युद्धाची. या देशाला कधीही जमिनीची हाव नव्हती. या देशाने कधीही जगभरात कुठेही आक्रमण केलेले नाही. मात्र तरीही अन्य कुणासाठी दीड लाखांहून अधिक आपले सैनिक पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक युध्दात शहीद झाले. दीड लाख संख्या कमी नाही. मात्र आम्ही भारतीय आहोत. त्या शहीदांबरोबर जोडल्यामुळे जगाला आपल्या एवढ्या मोठ्या बलिदानाची जाणीव करू शकणार नाही आणि या दिवसांमध्ये जेव्हा मी जगभर फिरलो, तेव्ही मी ही गोष्ट जर तिथे कुठे छोटंसं स्मारक असेल तर मोठ्या आग्रहाने मी तिथे जातो. जगाने या गोष्टीचा स्वीकार करावा की आपण ते लोक आहोत, जे कुणासाठी प्राण देतात. आपण ते लोक आहोत, जे कुणासाठी बलिदान देतात. आपली ही महान परंपरा आहे, ही आपली उज्ज्वल गाथा आहे. आणि ही जी आपली ताकद आहे, त्याची जाणीव जगाला मानवतेपासून सामर्थ्यापर्यंत करत रहाणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
आगामी काळात देखील जग भारताकडे ज्या दृष्टीने आता पाहत आहे, भारताकडून अपेक्षा करत आहे, त्यामध्ये जगभर पसरलेला आपला भारतीय समुदाय खूप मोठी भूमिका बजावू शकतो. आपला भारतीय समुदाय जगभरातील देशांमध्ये जाऊन राजकारण करत नाही. तो सत्ता हडपण्याच्या खेळात जुटत नाही. तो तिथे राहून समाजाच्या कल्याणासाठी काय करता येईल याची काळजी करतो. जगातील कोणत्याही देशात जा, जर शंभर वर्षांपासून भारतीय समुदाय राहत असेल, जर पन्नास वर्षांपासून राहत असेल, जर वीस वर्षांपासून त्यांच्या शेजारी राहत असेल, कुठूनही भारतीय समुदाय तिथे राहिल्यामुळे तिथल्या लोकांना कधीही कोणतीही समस्या भेडसावत नाही. किती सहजतेने त्यांच्यात समरस होतात. आपली तत्त्वे पाळत असतात, मात्र, सर्वांना आपलेपणा वाटत असतो आणि हाच तर आपल्या संस्कारांचा परिणाम आहे, आपला सांस्कृतिक वारसा आहे. आपला माणूस कुठेही गेला तरी ‘पाण्या, तुझा रंग कसा’ जसा मिसळून जातो, तशाच प्रकारे आपले लोक मिसळून जातात. आणि त्या आपलेपणामुळेच आपली एक ताकद बनते. हे भारतीय समुदायाचे वैशिष्टय आहे. भारतामध्ये पर्यटन विकासाच्या अमाप संधी आहेत. जगातील सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे.
तुम्ही जगभरातील काही देशांमध्ये गेलात, मनोरंजनासाठी तुम्हाला खूप काही मिळेल. मात्र, मानव इतिहासाचा महान वारसा पहायचा असेल तर भारतासारखेच काही देश आहेत, जे लोकांना आकर्षित करू शकतील. आम्ही त्यांना एवढी दर्जेदार हॉटेल्स देऊ, आम्ही त्यांना आमची वैभवशाली स्थापत्यकला दाखवू. जगासमोर दाखवण्यासाठी आपल्याभारताकडे पर्यटन क्षेत्रात जो वारसा आहे. जगातील कोणत्याही देशांमध्ये जा, विचारा की प्राचीन वस्तू, कुणी 200 वर्षे जुनी सांगेल, कुणी 400 वर्षे जुनी सांगेल. आमच्याकडे कुणी आले तर आम्ही पाच हजार वर्षांपासून सुरू करू. जगाला देण्यासाठी आपल्याकडे काय काय नाही? प्रवासी भारतीय दिवस, भारत या विश्वासाने, आम्ही हे काम करू शकतो, आम्हाला करायचे आहे.
प्रवासी भारतीय दिवस केंद्र, जे 100 वर्षांपूर्वी भारताबाहेर गेले आहे. त्याला एवढे माहीत आहे की माझा रंग, माझं रक्त या देशाशी जुडलेलं आहे. मात्र इथे आल्यानंतर त्याला विचारणारे कुणीही नाही. कोण आहात तुम्ही. ना घराचा पत्ता आहे, ना गावाचा. त्याला असे वाटेल, चला, मला एक घर मिळाले. ते माझे अंथरुण घेऊन विचारपूस करून आपले स्थान निर्माण करू शकतील. हे पावणे तीन कोटी जगभरात विखुरलेल्या लोकांचे असे एक केंद्र बनले आहे. ते निघतील तेव्हा केवळ संकेतस्थळावर पाहिले असेल. इथे आल्यावर त्याला कुणीतरी भेटेल, आपुलकीने विचारपूस करेल. बिहार रेल्वे स्थानकात जायचे आहे, ठीक आहे. हे पहा, असे जाता येते. अच्छा, हे तुमचे गाव होते. हे बघा, प्रयत्न करूया, पाहू कुणी तुमचे नातेवाईक भेटतात का? ही एक खूप मोठी समर्पित व्यवस्था आहे. मला विश्वास वाटतो, जगभरातील अनिवासी भारतीयांसाठी खूपच लाभदायक ठरेल.
मला सांगण्यात आले आहे की, सुमारे 60-70 देशांमधील अनिवासी भारतीय नागरिक हा कार्यक्रम पाहत आहेत, ऐकत आहेत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. आज इथे आणखी एक प्रस्ताव मांडण्यात आला. भारताप्रति कुतूहल किती मोठे आहे, त्याचे सर्वात मोठे कारण योग हे आहे. संपूर्ण जग योगाचा उत्सव साजरा करण्यासाठी ज्याप्रकारे पुढाकार घेत आहे, जगभरातील सरकारे, जगातील राष्ट्रप्रमुख सर्वजण एकत्र येत आहेत. योगाच्या प्रति एक श्रद्धेची भावना निर्माण झाली आहे. मानसिक तणावाखाली असलेल्या व्यस्त जीवनशैली असलेल्या समाजाला जर आंतरिक शांती देण्याची ताकद कुणात असेल तर भारतात विकसित झालेली एक व्यवस्था आहे. ज्यामध्ये शरीर, मन, बुध्दी सर्वांना जोडण्याचे सामर्थ्य आहे. 21 जून रोजी जेव्हा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला, त्यावेळी मी देशभरातील योगाशी जोडलेल्या लोकांना आवाहन केले होते, विशेषत: भारतीय नागरिकांना की योगाचा प्रचार होणे ही चांगली गोष्ट आहे. योगाच्या आभा मंडळाचा विस्तार होणे ही आनंदाची बाब आहे. मात्र योगामुळे जर आजार बरा होत असेल तर सामान्य माणसासाठी खूप लाभदायक ठरेल आणि मी योगाची जी जाणकार मंडळी आहेत, त्यांना विनंती केली होती की भारतात जलद गतीने मधुमेह वाढत चालला आहे आणि प्रत्येक वयोगटात मधुमेह आढळत आहे. मधुमेह हा असा रोग आहे, जो अन्य सर्व आजारांना निमंत्रण देतो. तो सर्वात मोठा यजमान आहे. प्रत्येकाला तो नको आहे. आणि म्हणूनच योगाच्या माध्यमातून आपण मधुमेहापासून बचाव करू शकतो का? आणि मधुमेह असेल तर योगाच्या माध्यमातून तो नियंत्रित करू शकतो का? किंवा थोड्या फार प्रमाणात योग नियमितपणे केला तर मधुमेहापासून आपण मुक्त होऊ शकतो का?
या विषयातील तज्ज्ञ मंडळींशी आम्ही नियमितपणे संवाद साधला आणि मला सांगण्यात आले की, एक प्रोटोकॉल तयार केला आहे, एवढ्या गोष्टी केल्यावर अशा प्रकारे मधुमेहापासून दिलासा मिळू शकतो. हे जे प्रोटोकॉलचे पुस्तक आहे, ते आज प्रकाशित करण्यात आले. डॉ. नागेंद्र योगमधील तज्ज्ञ, ते इथे उपस्थित आहेत. आयुष मंत्रालय, जे हे काम पाहते, ते देखील उपस्थित आहे.
आणि हे देखील अगदी समर्पक आहे, की स्वत: महात्मा गांधी नैसर्गिक उपचाराद्वारे आरोग्याची काळजी घेण्याच्या मताचे होते. निसर्गोपचारावर त्यांची खूप श्रद्धा होती. आज त्याच 2 ऑक्टोबरला आपण आंतरराष्ट्रीय भारतीय समुदाय केंद्राचे उद्घाटन करत आहोत. आणि हेच तर आहे, ज्यामुळे जगभारात योगाचा प्रसार झाला आहे. आज याच समारंभाबरोबर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तो कोण आहे, जो आगामी काळात काम करेल. जेव्हा गेल्या वेळी अनिवासी भारतीय दिन सुरू झाला होता, तेव्ही मी एक मुद्दा मांडला होता.
आणि मी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मनापासून अभिनंदन करतो. नाहीतर सरकारमध्ये मुद्दा मांडला जातो, त्यानंतर बैठका होतात, बैठकीनंतर नवीन मुद्दा समोर येतो. पुन्हा एक बैठक होते, ज्यामध्ये जुना मुद्दा शोधावा लागतो की मूळ मुद्दा काय होता. त्यानंतर पुन्हा बैठक होते, पुन्हा चर्चा होते, नंतर तो वित्त विभागात जाऊन अडकतो. सरकार असे चालते सर्वांना माहित आहे. मात्र परराष्ट्र विभाग आहे, नऊ महिन्यांच्या आत एवढे मोठे काम करून दाखवले आणि ती होती प्रश्नमंजुषा स्पर्धा. जगभरातील समुदायाला भारताबाबत जाणून घेण्यासाठी विशेषत: तरुण पिढीला, आपला देश कसा होता, काय होता आणि काय वैशिष्टय होते आणि आज तंत्रज्ञानामुळे खूप सोपे आहे. ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत भारताची माहिती देणारी हजारो प्रश्नोत्तरे उपलब्ध आहेत.
आणि जगभरातील कित्येक देशांनी, तिथल्या तरुणांनी ऑनलाईन येऊन स्पर्धेत भाग घेतला. कल्पनेपलिकडे त्यांनी चांगली कामगिरी केली. कधी-कधी भारतातील मुलांना तपशीलवार विचारले ताजमहालविषयी, तर बहुधा सांगू शकणार नाहीत. या बाहेर राहणाऱ्या मुलांनी शोधून तयार केले आणि तो सांगू शकत आहे. आगामी काळात जगभरातील भारतीयांना भारताबाबतची प्रत्येक माहिती मिळू शकण्यासाठी एक ऑनलाईन आंदोलन चालू झाले आहे. ही माहिती केवळ ज्ञानवर्धकच नाही, केवळ भारताप्रति ओढ वाढवणे यासाठी नाही, ती माहिती आहे, जेव्हा तो शाळेत जात असेल, महाविद्यालयात जात असेल, आपल्या मित्रांबरोबर बसत असेल, त्यांना सांगत असेल, तुम्हाला माहीत आहे भारत असा आहे, तुम्हाला माहीत आहे भारतात मी हे वाचले आहे. तुम्हाला माहीत आहे, भारतात अशी घटना घडली होती. त्यांच्या मित्रांमध्येही तो पर्यटनाचे बीज रोवेल. ही प्रश्नमंजुषा स्पर्धा भविष्यातील सर्वात यशस्वी पर्यटनासाठी बीज रोवण्याचे काम करेल.
आणि मी अभिनंदन करतो, काही विजेते आहेत. जे आले आहेत, त्यांना देखील “भारत दर्शनाची” संधी मिळणार आहे. काही लोकांनी बहुतेक भारत दर्शन केलेले असेल. अनेक जण असे असतील जे पहिल्यांदा भारतात आले असतील, असे देखील होऊ शकते. मात्र मी न्यूझीलंडमधून आलेल्या वरुणचे अभिनंदन करतो. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या अखिलचे अभिनंदन करतो. केनियामधून कार्तिक, अमेरिकेतून आदित्य, आयर्लंडमधून श्वेता, यूएईमधून आदित्य हे सर्व विजेते आहेत. या सर्वांना बक्षिस देण्याची संधी मला मिळाली आहे. मात्र मी पुन्हा एकदा तुम्ही जो उत्साह दाखवलात, त्यांच्याकडून मी अपेक्षा करेन. संपूर्ण जगभरातून सुमारे पाच हजार लोक यात सहभागी झाले. मात्र मी त्या पाच हजार लोकांकडून अपेक्षा करतो की, हा मुद्दा पुढे नेण्याचे तुमचे काम आहे आणि तुम्ही ऑनलाईन सर्वांना तयार करा. पन्नास हजार तरुण या स्पर्धेत कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्या. भव्य स्पर्धा व्हायला हवी त्यातून देखील लोक विजयी होऊन यावेत. यासाठी मी विजेत्यांना शुभेच्छा देतो. हे काम एवढ्या कमी वेळेत यशस्वीपणे केल्याबद्दल मी परराष्ट्र विभागाचे खूप खूप अभिनंदन करतो. जगभरात पोहोचलेल्या भारतीय समुदायाला आज 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी एक अतिशय उत्तम भेट एक प्रवासी महात्मा गांधी तुम्हाला दिली आहे, हे केंद्र तुमचे आहे, तुमचे घर आहे.
खूप खूप धन्यवाद!
B.Gokhale/S.Kane/P.Kor
We are inaugurating this Kendra on a significant day- 2nd October. Gandhi JI had left India but the call of the nation brought him back: PM
— PMO India (@PMOIndia) October 2, 2016
Let us view our diaspora not only in terms of 'Sankhya' but let us see it as 'Shakti.' : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 2, 2016
World's keenness to engage with India has risen. In such times 'fear of unknown' can be an obstacle. Our diaspora can help overcome this: PM
— PMO India (@PMOIndia) October 2, 2016
Connecting with the diaspora is essential. Atal Ji started idea of PBD and it has been continued thereafter: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 2, 2016
Through Yoga, can we overcome diabetes? Or control diabetes. Had spoken about it during the 2016 Yoga Day also: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 2, 2016