पीएम्इंडिया
फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या निमंत्रणावरून मी 13 ते 18 जून 2026 या कालावधीत फ्रान्स आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
भारताच्या धोरणात्मक दृष्टिकोनात फ्रान्सला विशेष स्थान आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारताला भेट दिली होती आणि आम्ही आमच्या संबंधांना विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीत रूपांतर केले. नीस येथे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेतल्यानंतर आम्ही फेब्रुवारीपासून झालेल्या प्रगतीचा आढावा घेऊ आणि आमच्या सहकार्याची पुढील दिशा ठरवू. परस्पर हिताच्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवरही त्यांच्याशी चर्चा करण्यास मी उत्सुक आहे.
नीस येथे 14 जून 2026 रोजी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासमवेत भारत इनोव्हेट्स उपक्रमाचे उद्घाटन करण्यासही मी उत्सुक आहे. भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण उपक्रम भारतातील सर्वाधिक आशादायक स्टार्ट-अप्सना जागतिक गुंतवणुकीशी जोडेल आणि भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेतून उदयास येणाऱ्या नवकल्पनांना मोठी चालना देणारा ठरेल.
नीस येथून मी 14 ते 15 जून 2026 या कालावधीत स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहे. 1993 मध्ये स्लोव्हाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा असेल. हा ऐतिहासिक दौरा आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये निर्माण झालेल्या सकारात्मक गतीला अधिक बळ देणारा ठरेल. ब्रातिस्लावा येथे राष्ट्राध्यक्ष पेलेग्रिनी आणि पंतप्रधान फिको यांच्याशी चर्चा करण्यास मी उत्सुक आहे. तसेच स्लोव्हाकियातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधींशी संवाद साधण्याचीही मला संधी मिळणार आहे. भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या गतीला पुढे नेत हा दौरा युरोपियन संघासोबतच्या आपल्या सामरिक भागीदारीला आणखी चालना देईल. स्लोव्हाकिया हा युरोपियन संघाचा एक महत्त्वाचा आणि मूल्यवान सदस्य आहे.
स्लोव्हाकियानंतर मी एव्हियान येथे जाईन, तिथे 16 आणि 17 जून 2026 रोजी होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहे. जी-7 मध्ये भारताची उपस्थिती ही आपल्या भागीदार देशांनी भारतावर दाखविलेल्या विश्वासाचे आणि जागतिक स्तरावर वाढत असलेल्या भारताच्या प्रभावाचे प्रतीक आहे. भारताला सलग आठव्यांदा जी-7 शिखर परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. जी-7 परिषदेत भारत केवळ स्वतःची भूमिका मांडणार नाही, तर ग्लोबल साऊथमधील देशांच्या आकांक्षांनाही आवाज देईल.
18 जून 2026 रोजी पॅरिस येथे माझ्या फ्रान्स दौऱ्याची सांगता होईल. यावेळी मी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासमवेत व्हिवाटेक 2026 मध्ये सहभागी होणार आहे. व्हिवाटेक हा युरोपमधील तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा मेळावा मानला जातो. या वर्षीच्या आवृत्तीत भारताचा राष्ट्रीय मंडप सर्वांत मोठा असणार असून, भारतीय आणि युरोपीय नवोन्मेष परिसंस्थांमधील भागीदारीच्या अफाट क्षमतेचे ते समर्पक प्रतीक ठरेल. पॅरिसमधील उत्साही भारतीय समुदायाच्या सदस्यांची भेट घेण्यासही मी उत्सुक आहे. हा समुदाय आपल्या दोन्ही देशांमधील जिवंत सेतू म्हणून कार्य करत आहे.
मला विश्वास आहे की, फ्रान्स आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या माझ्या दौऱ्यांमुळे युरोप तसेच जी-7 देशांसोबत भारताचे अधिक दृढ होत असलेले संबंध आणखी बळकट होतील. तसेच, युरोपीय खंडासह त्यापलीकडील देशांबरोबरच्या भागीदारीच्या नव्या संधी विस्तारण्याबाबतची भारताची ठाम वचनबद्धता या दौऱ्यांतून अधोरेखित होईल.
***
अंबादास यादव/राज दळेकर /परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
PM @narendramodi embarks on a two-nation visit to France and Slovakia. pic.twitter.com/b9RklXSopM
— PMO India (@PMOIndia) June 13, 2026
Over the next few days, I will be in France and Slovakia to attend various programmes, including bilateral talks, multilateral engagements and interaction with the Indian diaspora. The focus will be on boosting economic as well as cultural linkages.
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2026
The visit will begin with…
On 16th and 17th June I will be in Evian to participate in the G7 Summit. I will be interacting with various world leaders and discussing a wide range of subjects. India will always focus on giving voice to the aspirations of the Global South.@G7
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2026
I will be in Paris on the 18th, where I will be attending VivaTech 2026 along with President Macron. I am glad to be attending one of Europe’s important gatherings for tech and innovation. On the same day, I also look forward to interacting with the Indian community of France.…
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2026