Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बंदरप्रणित विकासाला सरकारकडून चालना सागरमाला विकास कंपनी सुरु करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनी कायदा 2013 अंतर्गत, सागरमाला विकास कंपनी सुरु करायला मंजुरी दिली. ही कंपनी नौवहन मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असेल. ही कंपनी सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत निवासी प्रकल्पांना अर्थसहाय्य पुरवेल. 1 हजार कोटी रुपयांच्या प्राथमिक भागभांडवल आणि 90 कोटी रुपयांच्या नोंदणीकृत भागभांडवलासह सागरमाला विकास कंपनी सुरु करण्यात येईल.

निश्चित करण्यात आलेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी संबंधित बंदरे, राज्य सरकारे/सागरी मंडळे, केंद्रीय मंत्रालये प्रामुख्याने खासगी किंवा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून केली जाईल.

सागरमाला विकास कंपनी बंदर प्रणित विकास प्रकल्पांची निवड करेल आणि प्रकल्पाच्या विशेष हेतूने वाहनांना प्रकल्प विकास कामात मदत करेल.

सध्या सुरु असलेले प्रकल्प तसेच अन्य प्रकल्पांवर देखरेख आणि समन्वय साधण्यासाठी सागरमाला विकास कंपनी नोडल एजन्सी म्हणून काम करेल.

किनारपट्टी विकास योजनेचे व्यवस्थापन आणि किनारपट्टी विकास प्रकल्पांना निधी पुरवण्याचे काम सागरमाला विकास कंपनीकडे देण्यात आले आहे.

प्रकल्पांच्या विकासामध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी सागरमाला विकास कंपनी प्रयत्न करेल.

S.Kane/B.Gokhale