पीएम्इंडिया
इराणमध्ये चाबहार बंदराच्या विकसासाठी 150 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्ज तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आयोजित बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि इराणचे परिवहन मंत्री यांनी 6 मे 2015 रोजी यासंदर्भातल्या एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यानुसार भारत पहिल्या टप्प्यात चाबहार बंदरातले दोन धक्के वाहतुकीसाठी सज्ज करुन त्यांचे परिचालन करणार आहे. यासाठी 10 वर्षाचा भाडेकरार केला जाणार असून त्यासाठी भारत 82.21 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची भांडवली गुंतवणुक करणार आहे. त्याचा वार्षिक महसूली खर्च 22.95 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका असेल. परस्पर सामंजस्याने भाडेकरारची 10 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा त्यानंतरच्या काळात यंत्रसामुग्रीची मालकी इराणला सोपवली जाईल.
M.Pange/S.Tupe/M.Desai