Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बस अपघातात झालेल्या अमरनाथ यात्रेकरुंच्या मृत्यूचे पंतप्रधानांना दु:ख, सानुग्रह मदत जाहीर


जम्मू-काश्मीरमध्ये बस अपघातात झालेल्या अमरनाथ यात्रेकरुंच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“अमरनाथ यात्रेकरुंच्या मृत्यूमुळे खूप दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

बस अपघातात जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवोत, अशी मी प्रार्थना करतो” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसदाराला दोन लाख रुपयांची सानुग्रह मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar