पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बागान येथील भूकंपामुळे बाधित पागोडांच्या संरक्षणासाठी म्यानमार बरोबर सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६-७ सप्टेंबर २०१७ दरम्यान म्यानमार दौऱ्यात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे म्यानमार बरोबर भारताचे सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध अधिक दृढ होतील. या प्रकल्पाच्या धार्मिक आणि पर्यटन महत्वामुळे म्यानमारच्या जनतेत भारताप्रति आदर वाढण्यास मदत होईल. म्यानमार भारताच्या विकास भागीदारीत याचे योगदान असेल. बागान हे म्यानमारचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. यामुळे स्मारकांच्या पुनर्विकास आणि संरक्षणात भारताचा अनुभव आणि ज्ञान याचे दर्शन म्यानमारसह अन्य देशातील पर्यटकांना घडवण्याची संधी भारताला मिळेल.
B.Gokhale/S.Kane/D.Rane