पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2026
ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA- बाफ्टा) ने ‘ EE BAFTA’ चित्रपट पुरस्कारांमध्ये बाल आणि कौटुंबिक श्रेणीमध्ये ‘बूंग’ या मणिपुरी चित्रपटाला विजेता म्हणून घोषित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ईई बाफ्टा’ चित्रपट पुरस्कारांमध्ये बाल आणि कौटुंबिक चित्रपट श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकल्याबद्दल ‘बूंग’ चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की ही कामगिरी अत्यंत आनंददायी आहे. विशेषतः मणिपूरसाठी हा क्षण खूप आनंदाचा आहे. पंतप्रधानांनी पुढे म्हटले की,हा पुरस्कार देशातली प्रचंड सर्जनशील प्रतिभा देखील अधोरेखित करतो.
सिने पुरस्काराच्या घोषणेबद्दल ‘बाफ्टा’ च्या एक्स पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले;
“या चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन. विशेषतः मणिपूरसाठी हा खरोखरच खूप आनंदाचा क्षण आहे. यातून आपल्या देशातील अफाट सर्जनशील प्रतिभा अधोरेखित होते.”
Congratulations to all those associated with this film. This is indeed a moment of immense joy, especially for Manipur. It also highlights the immense creative talent in our nation. https://t.co/fd95WriuTG
— Narendra Modi (@narendramodi) February 23, 2026
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com