Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘बाह्य अंतराळाचा शोध आणि शांततापूर्ण उद्देशासाठी उपयोग’ यासाठीच्या भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


‘बाह्य अंतराळाचा शोध आणि त्यांचा शांततापूर्ण उद्देशासाठी उपयोग’ यासंदर्भातल्या भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातल्या कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली. उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या नवी दिल्ली भेटीदरम्यान 1 ऑक्टोबरला या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

प्रभाव

या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे उपग्रह दळणवळण, उपग्रह नेव्हीगेशन, अंतराळ विज्ञान आणि बाह्य अंतराळ शोध यामधल्या नव्या संशोधन घडामोडी आणि उपयोग यासंदर्भातल्या शक्यतांना चालना मिळेल त्याचबरोबर भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले सहकार्य दृढ होईल.

लाभ

मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग या क्षेत्रात संयुक्त कार्य विकसित होण्यासाठी या करारामुळे मदत होणार आहे. या कराराची अंमलबजावणी करण्यासाठीची साधने तसेच काळ निश्चित करण्यासह इतर बाबींसंदर्भात कृती आराखडा करण्यासाठी संयुक्त कार्यकारी गट स्थापन करण्यात येणार आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor