पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला बाह्य अंतराळ क्षेत्रात सहकार्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि जपानीज एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी(जाक्सा ) यांच्यात ११ नोव्हेंबर २०१६ रोजी स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली.
दोन्ही देशातील कायदे आणि नियमांचे पालन करून शांततापूर्ण उद्देशांसाठी बाह्य अंतराळ क्षेत्राचा वापर करण्यासाठी भविष्यात एकत्रितपणे कार्यक्रम हाती घेणे हा या कराराचा उद्देश आहे.
पृथ्वीचे निरीक्षण, उपग्रह दूरसंचार आणि दिशादर्शक प्रणाली, संशोधन आणि विकास(अंतराळ प्रणाली आणि तंत्रज्ञान) आणि अंतराळ उद्योग प्रोत्साहन यांसारख्या अंतराळ विज्ञान तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याला यामुळे वाव मिळेल.
या करारानुसार, इस्रो आणि जाक्सा आपापल्या मोहिमांचा खर्च करतील. या करारांतर्गत त्यांची संबंधित भूमिका आणि मोहिमा पार पाडण्याची क्षमता त्यांच्या निधीच्या उपलब्धतेवर आणि त्यांच्या देशातील कायद्यानुसार राहील.
या करारामुळे मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी संयुक्तपणे कार्यक्रम राबवण्यात येतील. यामुळे देशातील सर्व घटकांना आणि प्रदेशांना लाभ होईल.
B.Gokhale/S.Kane/Anagha