Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“बिमस्टेक” राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांशी पंतप्रधानांची चर्चा

“बिमस्टेक” राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांशी पंतप्रधानांची चर्चा


“बिमस्टेक”च्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चर्चा केली.

सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची अशा प्रकारे पहिल्यांदाच बैठक बोलावल्याबद्दल उपस्थित प्रतिनिधींनी पंतप्रधानांचे कौतुक केले.

या बैठकीच्या उद्दिष्टाविषयी राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांनी यावेळी माहिती दिली.

नैसर्गिक आपत्तीबरोबरच दहशतवाद, अतिरेकी कारवाया, वंशवाद, अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि मानवी तस्करी यासारखे प्रश्न बिमस्टेकच्या सर्वच सदस्य देशांना भेडसावत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न बिमस्टेकच्या माध्यमातून करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेच्या वेळी केले.

सागरी सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यासारखे अपारंपरिक प्रश्नही आधुनिक काळात गंभीर बनत आहेत, त्यामुळे बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन यावर संयुक्तपणे उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याचेही मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha