पीएम्इंडिया
बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सहसंस्थापक आणि विश्वस्त बिल गेट्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. स्वच्छ ऊर्जा उपक्रम, आर्थिक सर्वसमावेशकता, स्वच्छता, आरोग्य आणि पोषण हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. भारतात पुनर्नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात झालेल्या कामाची बिल गेट्स यांनी प्रशंसा केली आणि स्वच्छ ऊर्जेचा खर्च हायड्रोकार्बनच्या स्तरावर कमी करण्याच्या गरजेवर भर दिला.
आर्थिक समावेशकतेसंदर्भात चांगली प्रगती होत असल्याेचे सांगून गेट्स यांनी या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी सहकार्य देऊ केले. देशभरात हायब्रिड पेमेंट बँका स्थापन करण्यासाठी टपाल विभागाची सध्याची पायाभूत रचना मजबूत करण्याच्या मुद्दयावर देखील चर्चा झाली. आरोग्य मुद्दयासंदर्भात, विशेषत: नवीन लसी आणल्याबद्दल गेट्स यांनी प्रशंसा केली. स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छतेत सुधारण करण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांबाबत यावेळी विस्तृत चर्चा झाली.
S.Kane/S.Tupe/M.Desai
Discussed clean energy initiatives, financial inclusion & other issues with Mr. @BillGates. https://t.co/sVnoyKFnco pic.twitter.com/xVfcP2nuLR
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2015