Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी पंतप्रधानांनी केली सदिच्छा व्यक्त


नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025

बांगलादेशच्या सार्वजनिक जीवनासाठी अनेक वर्षांपासून योगदान देणाऱ्या बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. यावेळी भारत सर्वतोपरी पाठिंबा देण्यास तयार आहे, असे मोदी यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हटले, “बांगलादेशच्या सार्वजनिक जीवनासाठी अनेक वर्षांपासून आपले योगदान देणाऱ्या बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर मला खूप चिंता वाटली. त्यांच्या प्रकृतीत लवकर होण्यासाठी आमची मनोभावे प्रार्थना आणि सदिच्छा. यावेळी भारत सर्व प्रकारे मदत करण्यास तयार आहे.”

नितीन फुल्लुके / संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com