पीएम्इंडिया
1) भारताचे युवक व्यवहार, क्रीडा मंत्रालय आणि बेलारुसचे शिक्षण मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करार.
2) भारताचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि बेलारुसचे शिक्षण मंत्रालय यांच्यात व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार.
3) भारतीय विज्ञान अकादमी आणि बेलारुसची नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस यांच्यात वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यासंदर्भातील करार.
4) भारतीय कृषी संशोधन परिषद आणि बेलारुशियन स्टेट ॲग्रीकल्चर अकादमी, गोरकी यांच्यात कृषी संशोधन आणि शिक्षणासंदर्भातील सहकार्यासाठीचा सामंजस्य करार.
5) भारताच्या कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय आणि बेलारुसच्या अन्न मंत्रालयात 16 एप्रिल 2007 रोजी झालेल्या करारात सुधारणा करणारा राजशिष्टाचार.
6) 2018-2020 या काळात सांस्कृतिक क्षेत्रासंदर्भात भारत आणि बेलारुस मधील सहकार्य कार्यक्रम.
7) भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि बेलारुसच्या स्टेट कर्न्सन ऑफ ऑईल अँड केमिस्ट्री यांच्यात तेल आणि वायू क्षेत्रासंदर्भातील सामंजस्य करार.
8) जे एस व्ही बेल्झारुबेश्ट्रॉय आणि नॅशनल बिल्डिंग्स कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील सामंजस्य करार.
9) जे एस सी बेलरुशियन पोटॅश कंपनी आणि इंडियन पोटॅश लिमिटेड यांच्यातील सामंजस्य करार.
10)ओ जे एस सी मिन्स्क ट्रॅक्टर वर्क्स आणि भारतातील पुण्यात किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड यांच्यातील सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीचा करार.
B.Gokhale/M.Pange/D.Rane