Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या नवीन इमारत संकुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या नवीन इमारत संकुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत कोनशिलेचं अनावरण करुन बॉम्बे आर्ट सोसायटीच्या नव्या इमारत संकुलाचे उद्‌घाटन केले. तीन शतकांवर आपला ठसा उमटवणारी अशी एखादीच संस्था असते, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. 19व्या शतकात संस्था स्थापन झाल्यापासून बॉम्बे आर्ट सोसायटीनं हे साध्य केल्याचं पंतप्रधानांनी सांगितले. कलेमधे स्वत:ची ताकद आणि स्वत:चा संदेश असतो हेच यामागचं कारण आहे, असंही ते म्हणाले. कला ही केवळ भिंतीवरील शोभेची वस्तू नसून, ती समाजाचे बलस्थान आहे, यावर त्यांनी भर दिला. मुलांच्या सर्वंकष व्यक्तीमत्त्व विकासात कलेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या यंत्रयुगातही माणसातील माणूसपण जागृत ठेवण्यात कला मोठी भूमिका बजावते.

कला ही राजाश्रीत नव्हे, तर राज्य पुरस्कृत असली पाहिजे, असं त्यांनी सांगितले.
आर्ट या शब्दातील A, R आणि T या अक्षरांबद्दल विस्तृतपणे बोलताना पंतप्रधानांनी सांगितलं की, या अक्षरातून कलेचा अर्थ विषद करणारी, वयातीत, कलातीत, वंशवादविरहित, प्रादेशिक बंधनं नसलेली मूल्यं प्रतित होतात.

एखाद्या कलाकृतीचा प्रवास मांडण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, असं सुचवून पंतप्रधान म्हणाले की, यामुळे एखाद्या कलाकाराची विचार प्रक्रिया जाणून घेणं लोकांना शक्य होईल.

N. Chitale / S. Tupe / M. Desai