Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बोडो करार हा बोडो लोकांसाठी नवीन सुरुवातीचा संदेश आहे, यामुळे आसामची एकता आणि अखंडता अधिक बळकट होईल-पंतप्रधान


बोडो करार हा आसाममध्ये शांतता आणि विकासासाठी एक ऐतिहासिक अध्याय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोडो कराराची प्रशंसा करतांना ते सांगितले की हा करार ‘सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास’ या मंत्राने आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेने प्रेरित आहे.

ट्विटरवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले, ‘पूज्य बापूंच्या पुण्यतिथिनिमित्त आज संपूर्ण भारत त्यांचे स्मरण करत असल्याने आसाममध्ये शांतता आणि विकासाचा ऐतिहासिक अध्याय सुरू झाला आहे. 50 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आपल्या बोडो मित्रांबरोबरच्या करारांमुळे नवीन सुरूवात झाली आहे. यामुळे आसामची एकता बळकट होईल, विकास होईल आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करेल.’

बोडो संघटनांबरोबर ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर बोडो परिसराच्या विकासाला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. 1500 कोटी रुपयांच्या सर्व समावेशक पॅकेजवर काम सुरू झाले आहे. जीवनमान सुलभ बनवण्यावर तसेच सरकारी योजनांचा बोडो लोकांना संपूर्ण लाभ सुनिश्चित करण्यावर आमचा विशेष भर राहिल.

बोडो मित्र शांततेच्या मार्गावर आपल्याबरोबर आले आहेत. हिंसाचाराचा मार्ग सोडून लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवला तर समस्यांवर तोडगा निघू शकतो, असा स्पष्ट संदेश यातून मिळाला आहे. मी बोडो मित्रांचे मुख्य प्रवाहात स्वागत करतो. बोडो परिसराच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

पूज्य बापूंच्या पुण्यतिथी दिनी पाच दशकं जुन्या बोडो समस्यांवर तोडगा निघाला आहे. बोडो संघटना आणि सरकार यांच्यातील या करारामुळे आसामची एकता आणि अखंडता अधिक बळकट होईल. हिंसाचाराचा मार्ग सोडल्याचा तसेच लोकशाही आणि संविधानावर पुन्हा विश्वास ठेवण्याचा बोडो मित्रांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.

आपल्या बोडो मित्रांबरोबरचा हा करार आसाम आणि देशातील अन्य हिंसाचारग्रस्त भागांसाठी एक संदेश आहे. हिंसाचार आणि भयमूक्त वातावरणातच राष्ट्राच्या विकासाला गती देता येते. आपल्या बोडो मित्रांची संपूर्ण ऊर्जेने आसामचा विकास अधिक बळकट होईल, याचा मला आनंद आहे.

आसामच्या अन्य समुदायांच्या हिताचे रक्षण करत बोडो मित्रांबरोबर करार करण्यात आला हा सर्वांचा विजय आहे, मानवतेसाठी विजय आहे, सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्राने आणि एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेने हा विजय प्रेरित आहे.’

B.Gokhale/S.Kane/P.Kor