Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बौद्धिक संपदेविषयी भारत आणि स्वीडन यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


बौद्धिक संपदेविषयी भारत आणि स्वीडन यांच्यातल्या सहकार्याविषयीच्या सामंजस्य कराराला केन्द्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. बौद्धिक संपदेविषयी स्वामित्व हक्कांचे अधिक उत्तम संरक्षण करण्यासाठी आणि बौद्धिक संपदेविषयी जागृती घडवण्यासाठी उभय देशात प्रशिक्षण कार्यक्रम आणि तंत्रविषयक आदान प्रदान या करारामुळे सुलभ होणार आहे. या कराराद्वारे निर्माण होणाऱ्या लवचिक यंत्रणेमुळे या क्षेत्रातल्या उत्तम प्रथेची देवाण घेवाणही शक्य होणार आहे. सहकार्य करण्याची क्षेत्रे निश्चित करण्यासाठी संयुक्त समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात दोन्ही देशातल्या सदस्यांचा समावेश राहील. उभय देशातल्या शैक्षणिक संस्था,व्यापारी आस्थापने आणि जनतेत, बौद्धिक संपदेविषयी जागृती निर्माण करणे आणि उत्तम प्रथेची देवाणघेवाण, प्रशिक्षण कार्यक्रमात सहयोग,स्वामित्व हक्कविषयीच्या अर्जांच्या निपटाऱ्यासाठी माहितीची आणि उत्तम प्रथांची देवाणघेवाण इत्यादी क्षेत्रात उभय देशात सहकार्य करण्यात येणार आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane