Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रम्हपुत्रा क्रॅकर आणि पॉलिमर मर्यादित आणि दिब्रुगड नजीकच्या लेपेटकाटा येथील नुमालीगड रिफायनरी मर्यादीतचा मेण प्रकल्प पंतप्रधानांनी राष्ट्राला अर्पण केले

ब्रम्हपुत्रा क्रॅकर आणि पॉलिमर मर्यादित आणि दिब्रुगड नजीकच्या लेपेटकाटा येथील नुमालीगड रिफायनरी मर्यादीतचा मेण प्रकल्प पंतप्रधानांनी राष्ट्राला अर्पण केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिब्रुगड नजीक लेपेटकाटा येथील ब्रम्हपुत्रा क्रॅकर आणि पॉलिमर मर्यादित कंपनी राष्ट्राला समर्पित केली, तसेच नुमालीगड रिफायनरीज्‌ मर्यादित हा मेणाचा प्रकल्प देखील राष्ट्राला समर्पित केला.

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, आज जे हे दोन प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आहेत ते दोन कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. (अ) नैसर्गिक कच्च्या मालासाठी त्यांनी मिळविलेल्या मूल्य वृध्दीसाठी, (ब) आसाममधील युवकांकरिता रोजगार संधी उपलब्धतेसाठी. हे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केल्यामुळे देशात आणि आसाममध्ये आनंदाचे वातावरण आहे असे मोदी म्हणाले.

हे प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, यामुळे खात्रीशीर रोजगार निर्मिती होईल आणि अतिरिक्त वाढणारा खर्च टाळता येईल. भारतीय युवकांना रोजगार मिळावे यासाठी देशात औद्योगिक विकास जलदगतीने होणे आवश्यक आहे. याचसंदर्भात पंतप्रधानांनी त्यांच्या “प्रगती” या उपक्रमाचा उल्लेख केला जो लाखो-करोडो रुपयांच्या बंद पडलेल्या प्रकल्पांना पुन्हा कार्यान्वित होण्याची चालना देतो.

भारताच्या सर्वांगिण विकासासाठी पूर्व भारताचा विकास झालाच पाहिजे याचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, ईशान्य भारतातील पायाभूत आणि दळणवळण सुविधांचा विकास करत केंद्र सरकार या प्रदेशाकडे विशेष लक्ष देत आहे.

पंतप्रधान म्हणाले की, युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवूनच केंद्र सरकारने मुद्रा आणि स्टार्ट अप इंडियासारखे उपक्रम सुरु केले आहेत. मोठया शहरांमध्येच नाही तर छोटया शहरांमध्ये देखील रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. केंद्र सरकार सांघिक सहकार्याच्या तत्त्वावर कार्य करत आहे आणि विकासासाठी केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित काम केले पाहिजे असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

S.Mhatre/S.Tupe/M.Desai