पीएम्इंडिया
–ब्रिक्स देशांच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही सध्याच्या सहकार्याला आणखी प्रोत्साहन देऊ. एकमेकांशी जोडलेला विकास साध्य करण्यासाठी आम्ही विकासाविषयी उत्तम प्रथा आणि अनुभवांची देवाण घेवाण,बाजारपेठांची एकमेकांशी सुलभ जोडणी,.त्याचबरोबर पायाभूत आणि वित्तीय एकात्मतेला प्रोत्साहन देऊ.उदयोन्मुख बाजारपेठाआणि विकसनशील देश या मंचाशी विस्तृत भागीदारीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू.यासंदर्भात समान आणि लवचिक प्रथा, संवादासाठी पुढाकार, ब्रिक्स सदस्य नसलेल्या राष्ट्रांशी सहकार्य यावरही भर देऊ.
–आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था अधिक न्यायय होण्याला चालना मिळावी यासाठी जागतिक आर्थिक प्रशासन अधिक सुधारण्यासाठी आम्ही दळण वळण आणि सहकार्य वृद्धिगत करू.जागतिक आर्थिक प्रशासनात,ब्रिक्स राष्ट्र आणि उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशाच्या व्यासपीठाचा आवाज आणि प्रतिनिधित्व वाढावे यासाठी आम्ही कार्य करू.खुल्या,सर्वसमावेशक आणि संतुलित आर्थिक जागतिकीकरणाला आम्ही प्रोत्साहन देऊ ज्यायोगे उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशाच्या व्यासपीठाच्या विकासाला आणि उत्तर दक्षिण विकासाचा असमतोल दूर करून जागतिक विकासात योगदान देता येईल.
–आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आम्ही न्यायय आणि निष्पक्षता यावर भर देऊ. संयुक्त राष्ट्रांची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या उचित आणि न्यायय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी आम्ही सहायय करू.आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर राखू,लोकशाहीला प्रोत्साहन देऊ आणि सामाईक पारंपरिक आणि बिगर पारंपरिक सुरक्षा आव्हानांची दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करू ज्यामुळे जागतिक समुदायाच्या उज्वल भविष्याची उभारणी होईल.
— सांस्कृतिक विविधता जपण्याबरोबरच जनतेचा परस्पर संबंध वाढण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ.पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंध अधिक सखोल करून याद्वारे ब्रिक्स सहकार्याला अधिक वाव मिळेल.जनतेतले आदान प्रदान चहू बाजूनी आम्ही वृद्धिगत करू.सदस्य राष्ट्राच्या संस्कृतीविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ,दळण वळण वृद्धिगत करू,पारंपरिक मैत्री दाट करण्यासाठी प्रयत्न करून ब्रिक्स भागीदारी जनतेला आपलीशी वाटावी यासाठी कार्य करू.
ब्रिक्स वास्तविक आर्थिक सहकार्य
ब्रिक्स आर्थिक भागीदारीसाठीच्या धोरणाच्या अंमलबजावणीविषयी पहिल्या अहवालाचे आम्ही स्वागत करतो.विभागीय मंत्र्याच्या बैठकीतल्या ठोस फलिताचेही आम्ही स्वागत करतो.बळकट,संतुलित आणि सर्वसमावेशी जागतिक विकासात योगदान देण्यासाठी सर्व म्हणजे वित्तीय आणि रचनात्मक अशा सर्व साधनांचा आणि नवोन्मेषी विकासात्मक धोरणाचा अवलंब करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत
ऊर्जा उपकरणे आणि तंत्रज्ञान यासाठी खुली,लवचिक आणि पारदर्शी बाजारपेठ उपलब्ध होण्याला चालना मिळावी यासाठी आम्ही कार्य करू. जीवाष्म इंधन,नैसर्गिक वायू,जल आणि अणू ऊर्जा यांच्या प्रभावी वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एकत्रित काम करू. ज्यायोगे,कमी उत्सर्जन असणारी व्यवस्था, ऊर्जा उपलब्धता आणि शाश्वत विकासाप्रति योगदान राहील.ब्रिक्स देशाच्या शाश्वत विकासासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने नागरी अणू ऊर्जा क्षमता वृद्धिगत करण्यासाठी तंत्रज्ञान आणि वित्त उपलब्ध होण्याचे महत्व आम्ही अधोरेखित करतो. ब्रिक्स ऊर्जा संशोधन सहकार्य मंच उभारणीसाठी चर्चा सुरु ठेवण्याला आम्ही प्रोत्साहन देत आहोत त्याचवेळी संबंधितांनी ऊर्जा सहकार्य आणि ऊर्जा क्षमता यावर संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन सुरूच ठेवावे असे आवाहन आम्ही करत आहोत.
जागतिक आर्थिक प्रशासन
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा
44.उत्तर कोरियाने (DPRK) घेतलेल्या अणुचाचण्यांबाबत आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. कोरियन द्विपकल्पात सध्या सुरु असलेला तणाव आणि दीर्घ काळ सुरु असलेल्या आण्विक पेचाबाबत आम्ही तीव्र चिंता व्यक्त करतो. सर्व संबंधित पक्षांमध्ये थेट चर्चा आणि शांततापूर्ण मार्गानेच तो सोडवला जाऊ शकतो यावर जोर देतो.
आदान-प्रदान कार्यक्रमावर भर
B.Gokhale/S.Bedekar/U.Kulkarni
BRICS leaders at the Summit in Xiamen. pic.twitter.com/QBhB2fdY3O
— PMO India (@PMOIndia) September 4, 2017