Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन

ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन

ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन


उपस्थित मान्यवर,

ब्रिक्सच्या आर्थिक उपक्रमांबाबत आपण अभिमान बाळगू शकतो. यामुळे केवळ ब्रिक्स देशांची अर्थव्यवस्थाच मजबूत होणार नाही तर विकसनशील जगाला देखील याचा लाभ होईल.

आणि म्हणूनच आपण जी-20 च्या कार्यक्रमांमध्ये तसेच उपक्रमांमध्ये आपले प्राधान्यक्रम मांडायला हवेत.

सर्वप्रथम, जी-20 देशांनी विकास क्षेत्रात शाश्वत विकास कार्यक्रम 2030 ची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यासाठी पुरेसा निधी सुनिश्चितीला प्राधान्य दयायला हवे.

दुसरे म्हणजे, जागतिक वित्त क्षेत्रात जी-20 देशांनी पुढील बाबींवर भर दयायला हवा :-

• जागतिक आर्थिक संस्थांच्या पुनर्स्थापना निर्णयांची अंमलबजावणी.

• बहुपक्षीय आणि प्रादेशिक आर्थिक संस्थांदरम्यान व्यापक भागीदारी.

• विकसनशील देशांमध्ये पायाभूत सुविधांसाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा वाढवणे.

• पुढल्या पिढीच्या पर्यावरण स्नेही पायाभूत सुविधांचा विकास करणे. यात कचऱ्याचा कच्चा माल म्हणून पायाभूत विकासासाठी वापर करण्याचा देखील समावेश असेल.

• 2030 सालापूर्वी जागतिक वित्तप्रेषणाच्या खर्चात कपात करणे.

• भ्रष्टाचार रोखण्यासाठी व्यापक समन्वय आणि परदेशात जमा बेहिशेबी धन जप्त करण्यासाठी आणि ते मायदेशात परत पाठवण्यासाठी सहकार्य.

तिसरी बाब म्हणजे, व्यापार क्षेत्राात आपणी पुढील बाबींवर लक्ष केंद्रीत करायला हवेत.

• नियमाधारित जागतिक व्यापार व्यवस्था मजबूत करणे आणि नवीन ट्रेडिंग ब्लॉक्समुळे जागतिक व्यापार पध्दतींचे विभाजन होणार नाही, हे सुनिश्चित करणे.

• दोहा विकास कार्यक्रम जलद गतीने पूर्ण करणे.

• कुशल व्यावसायिकांच्या आदान-प्रदानाला प्रोत्साहन देणे आणि जागतिक कौशल्य बाजारपेठ निर्माण करणे.

चौथा मुद्दा, हवामान बदल क्षेत्रात जी-20 देशांच्या प्राधान्यक्रमांमध्ये पुढील बाबींचा समावेश असावा.

• हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेच्या तत्त्वांवर आधारित सीओपी-21 च्या यशस्वी तोडग्यामध्ये समान पण विभिन्न जबाबदाऱ्यांचा सिध्दांत समाविष्ट करणे.

• विकसनशील देशांना हवामान वित्तसहाय्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाची सुविधा पुरवणे.

• स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता, कार्यक्षमता आणि परवडण्याजोगी किंमत यासाठी स्वच्छ आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जेच्या संशोधन आणि विकासाला गती देणे.

• पुढल्या पिढीच्या आणि पर्यावरणस्नेही पायाभूत सुविधांच्या विकासात सहकार्य करणे.

• भारतद्वारा प्रस्तावित आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला समर्थन देणे.

पाचवा मुद्दा, जी-20 देशांनी पुढील बाबींच्या सहाय्याने सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी मजबूत जागतिक योजनेला प्रोत्साहन दयायला हवे.

• दहशतवादयांचा वित्तपुरवठा, सामुग्री आणि दळणवळण यंत्रणा बंद करण्यासाठी सर्वसमावेशक जागतिक धोरण.

• दहशतवादी गटांना शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा होणारा पुरवठा थांबवणे.

• दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी विशेष आंतरराष्ट्रीय कायदे व्यवस्था विकसित करणे.

• दहशतवाद्यांकडून होणारा सायबर नेटवर्कचा वापर रोखण्यासाठी सहकार्य.

• आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक परिषदेचा त्वरित स्वीकार.

मला खात्री आहे, की, ब्रिक्स अर्थव्यवस्था यापुढेही मजबूत आणि स्थिर राहील आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मजबूत स्रोत बनेल.

मान्यवरांनो,

उफा येथे मान्यता देण्यात आलेले ब्रिक्स आर्थिक सहकार्यासाठीचे धोरण हा एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे.

या धोरणाची कालबध्द पध्दतीने अंमलबजावणी करण्यासाठी “कॉन्टॅक्ट ग्रुप ऑन ट्रेड अँड इकॉनॉमिक इश्यूज अँड बिझनेस कौन्सिल” ने एक कृती आराखडा तयार करायला हवा.

प्रत्येक ब्रिक्स सदस्य देशाने, धोरणात नमूद करण्यात आलेल्या किमान दोन प्राधान्य क्षेत्रांमध्ये पुढाकार घ्यायला हवा. पहिली संयुक्त बैठक रशियाच्या अध्यक्षतेखाली झाल्यास योग्य ठरेल.

संयुक्त बैठक 2020 पर्यंत व्यापार, आर्थिक आणि गुंतवणूक सहकार्यासाठी मार्गदर्शिकेवर काम करु शकते.

मान्यवरांनो,

आपण आशा करुया की, नवीन विकास बँक लवकरच आपले परिचालन सुरु करेल. जसे मी उफा येथे म्हटले होते की, त्यांचा पहिला प्रकल्प स्वच्छ ऊर्जेवर असायला हवा आणि सर्व ब्रिक्स देशांमध्ये असायला हवा.

आपण नवीन विकास बँक संस्था किवा एनडीबीआयसारखी एक सहाय्यक यंत्रणा निर्माण करायला हवी, जी संकल्पनांची बँक, अनुभवाचे भांडार आणि ज्ञानाचे पॉवर हाऊस म्हणून काम करेल. आणीबाणीच्या प्रसंगी राखीव व्यवस्थेसाठी ही यंत्रणा उपयुक्त माहिती देखील पुरवेल.

मान्यवरांनो,

भारत परस्पर विश्वास, आदर आणि पारदर्शकतेच्या भावनेने यापुढेही ब्रिक्स भागीदारांसह काम करत राहील.

मी उफामध्ये काही संकल्पना मांडल्या होत्या. यात व्यापार मेळावे, कृषी संशोधन, रेल्वे संशोधन, डिजिटल उपक्रम, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान, राज्ये, शहरे आणि स्थानिक संस्थांदरम्यान सहकार्य, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रात आदान-प्रदानाला प्रोत्साहन आदींचा समावेश आहे.

आपण यावर काम करत राहू आणि ब्रिक्सच्या कार्यक्रम पत्रिकेवर नवीन कल्पना मांडत राहू.

ब्रिक्सची संस्थात्मक यंत्रणा मजबूत करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काम करु.

पुढल्यावर्षी भारतात होणाऱ्या आठव्या शिखर परिषदेसाठी मी तुमची वाट पाहत आहे.

धन्यवाद !

S.Kane/B.Gokhale