Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण


महामहीम राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन,

महामहीम राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग

महामहीम राष्ट्राध्यक्ष जेकब जुमा

महामहीम राष्ट्राध्यक्ष दिल्मा रोसेफ,

आजच्या बैठकीच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आणि ब्रिक्सच्या नेतृत्वाबद्दल मी यजमान, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे आभार मानतो.

सातव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन.

महामहीम,

पॅरिसमधल्या भयानक दहशतवादी कृत्याचा आम्ही संघटितपणे तीव्र निषेध करतो. सिनाईमध्ये मारल्या गेलेल्या लोकांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो आणि रशिया प्रती पाठिंबा व्यक्त करतो. अंकारा आणि बैरुट ही दहशतवादाच्या वाढत्या प्रभावाची आठवण देत आहेत.

दहशतवादाविरोधात संपूर्ण मानवतेने एकजूट होऊन उभे ठाकायला हवे. दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी एकत्रित जागतिक प्रयत्नांची एवढी निकड कधीही भासली नव्हती. ब्रिक्स राष्ट्रांनीही या बाबीला प्राधान्य दयायला हवे.

एकेकाळी ब्रिक्स तर्कशास्त्र आणि क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. आपण कृतीने समर्पकतेचा आणि मूल्यांचा पुरावा दिला आणि जागतिक मोठया आव्हानाच्या काळात हे समोर आले आहे.

नवी विकास बँक, चलन भंडार व्यवस्था, ब्रिक्स आर्थिक सहयोगासाठी धोरण ही आमच्या कटिबद्‌धता आणि दृष्टिकोनाची द्योतक आहेत आपण एकत्र येऊन जी-20 ला आकार देऊ शकतो. भारत, ब्रिक्सला मोठे महत्व देत आहे. 1 फेब्रुवारी 2016 पासून ब्रिक्सचे अध्यक्षपद भारताकडे येणार आहे हा आमचा सन्मान आहे. भारताच्या अध्यक्षतेखालच्या ब्रिक्सची विशेष संकल्पना आहे. बिल्डिंग रिस्पॉन्सिव्ह अँड कलेक्टिव्ह सोल्यूशन म्हणजे संक्षिप्त रुपात ब्रिक्स म्हणजेच प्रतिआंर्तभूत आणि एकत्रित उपायांची उभारणी अगदी चपखलपणे आपल्या या समूहाचे हे वर्णन आहे.

ब्रिक्स भागीदार चीनकडे असलेल्या जी-20 अध्यक्षतेच्या काळात आम्ही त्यांना संपूर्ण पाठिंब्याचे आश्वासन देतो.

धन्यवाद !

N.Chitale/B.Gokhale