Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सकारात्मक आणि अर्थपूर्ण संवादाला अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामाईक 


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, येत्या काही दिवसात ब्रिक्स परिषदेसाठी जगभरातून मोठे नेते येणार आहेत. ही परिषद जगाच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या विविध विषयांवरील अर्थपूर्ण आणि सकारात्मक चर्चेची साक्षीदार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामाईक केले आहे –

“सद्भिरेव सहासीत सद्भिः कुर्वीत सङ्गतिम्।

सद्भिर्विवादं मैत्रीं च नासद्भिः किंचिदाचरेत्॥”

या सुभाषितात म्हटले आहे की,

 माणसाने नेहमी सत्पुरुषांच्या सहवासात राहावे आणि त्यांचा संग जोपासावा. सत्पुरुषांशी संवाद साधावा व मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत करावेत; कारण परस्पर सदिच्छा, संवाद आणि मैत्रीपूर्ण संबंध शांतता व सहकार्य अधिक दृढ करतात.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,

येणाऱ्या काही दिवसात जगभरातील नेते ब्रिक्स परिषदेसाठी एकत्र येतील. मला पूर्ण विश्वास आहे की, या परिषदेत विश्वाच्या कल्याणाच्या विचारांसह विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल. 

***

नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai