Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी घेतली आफ्रिका महासंघाचे अध्यक्ष आणि बुरुंडी प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत 18व्या ब्रिक्स परिषदेदरम्यान आफ्रिका महासंघाचे अध्यक्ष आणि बुरुंडी प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम एवारिस्टे एन्दायिशिमिये यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली.

उभय देशांच्या नेत्यांनी, 2023 मधील भारताच्या अध्यक्षतेखाली आफ्रिकन महासंघाच्या जी 20 गटात समावेश कऱण्याबाबत भारताच्या भुमिकेला उजाळा देत, ग्लोबल साऊथ (विकसनशील) देशांमधील सहकार्यात भारत- आफ्रिका महासंघ भागीदारी मुख्य आधारस्तंभ असण्यावर भर दिला. त्यांनी परस्परांच्या सोयीने 4थ्या भारत आफ्रिका मंच शिखर परिषदेचे लवकरात लवकर आयोजन कऱण्याबाबत चर्चा केली.

पंतप्रधानांनी आफ्रिका महासंघाच्या नेतृत्वाचे, इबोलाच्या उद्रेकाला यशस्वीपणे तोंड दिल्याबद्दल कौतुक केले. या उद्रेकाची तीव्रता कमी करण्यासाठी आफ्रिका सीडीसीला भारताकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय मदतीबद्दल आफ्रिकन महासंघाच्या नेत्यांनी प्रशंसा केली.

दोन्ही नेत्यांनी स्नेहपूर्ण, एकता आणि विकासाच्या सामायिक आकांक्षावर आधारित असलेल्या भारत – बुरुंडी संबंधांवरही चर्चा केली. तसेच आर्थिक सहकार्य, विकास भागीदारी, कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण, आरोग्यसेवा आणि क्षमता बांधणी उपक्रम या क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांचाही आढावा घेतला.

***

शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]