Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘ब्रिजीटल नेशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन


देशाच्या सामजिक आणि उद्योग नेतृत्वाला नेहमीच प्रेरणा आणि चैतन्य देणारे, रतन टाटा, त्यांचा हा वसा पुढे सुरु ठेवणारे एन चंद्रशेखरन, रूपा जी, आणि उपस्थित मान्यवर,

रतन टाटा, चंद्रशेखरन यांना भेटणे, त्यांच्या समवेत चर्चा करणे हा नेहमीच एक नवा अनुभव असतो. देशातल्या सर्वात मोठ्या संस्थांपैकी एकाकडे नेतृत्व देण्याचे जबाबदारी यांच्यावर आहे.

इतकी मोठी जबाबदारी असूनही हास्य आणि तणावरहित, कसे राहता येते, मला वाटते येत्या काळात यावरही चंद्रशेखरन यांनी एक पुस्तक लिहावे. या कल्पनेचे माझे पेटंटही नाही. कोणताही ताण न घेता आपण हे काम करू शकता.

मित्रहो,

ते पुस्तक लिहितील किंवा नाही हे मला माहित नाही पण हास्य आणि तणाव रहित मनामुळे काय होते, त्याचा परिणाम ब्रिजीटल नेशन या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर आहे.

याच सकारात्मकता, सृजनशीलता आणि विधायक मनोवृत्तीतून देशाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपाय सुचतो.

हीच सकारात्मकता, अशीच आशावादी वृत्ती, आपली प्रतिभा आणि संसाधनांवर असाच विश्वास हा नव भारताचा विचार आहे.

आकांक्षी भारताला हे पुस्तक प्रेरणा देईलच त्याचबरोबर समाजातल्या काही निराशावादीनाही नवा दृष्टीकोन देईल असा मला विश्वास आहे. चंद्रशेखरजी आणि रुपा जी यांचे यादृष्‍ट्या दस्तावेजासाठी अभिनंदन.

मित्रहो,

हे पुस्तक अशा काळात आले आहे जेव्हा तंत्रज्ञानाला कमी लेखण्याचा मोठा प्रयत्न सुरु आहे. याबाबत भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विशेष करून भारताच्या संदर्भात तंत्रज्ञान हे आपल्या लोकसंख्येसाठी एक आव्हान ठरणारा घटक, या रुपात सादर केले जात आहे.

तंत्रज्ञान, जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नव्हे हा सरकारचा दृष्टीकोन या पुस्तकाने अधिक दृढ केला आहे.

तंत्रज्ञान म्हणजे जोडणारा सेतू आहे,विभाजन करणारा विभाजक नव्हे.

तंत्रज्ञान, कौशल्य आणि बळ वाढवणारे आहे, तंत्रज्ञान म्हणजे धोका नव्हे.

तंत्रज्ञान, मागणी आणि प्रदान यांच्यातला सेतू आहे.

तंत्रज्ञान, सरकार आणि प्रशासन यांच्यातला सेतू आहे.

तंत्रज्ञान, सर्वांसमवेत आणि सर्वांचा विकास यांना जोडणारा पूल आहे.

मित्रहो,

गेल्या पाच वर्षात आमची हीच भावना राहिली आहे आणि भविष्यासाठीही आमचा हाच दृष्टीकोन आहे.

कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन लर्निंग, रोबोटिक्स यासारखे आधुनिक तंत्रज्ञान, विकासाचे साधन म्हणून, विकासासाठी सहाय्यक म्हणून कसे उपयुक्त आहे हे या पुस्तकात उत्तम रीतीने सांगण्यात आले आहे.

हीच बाब मी आपल्या अनुभवावरुनही सांगू शकतो. गेल्या पाच वर्षात तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात प्रशासनात कशा सुधारणा आणि परिवर्तन घडले आहे हे आपण अनुभवत आहोत. हे सर्व कसे घडत आहे याचे उदाहरण मी आपल्याला देतो.

मित्रहो,

आपल्या देशात एलपीजी गॅस जोडणी देण्याची योजना, अनुदान देण्याचे काम दशकांपासून सुरु आहे.

आम्ही उज्ज्वला योजना सुरु केली तेव्हा अनेक लोकांना वाटले की ही योजनाही आधीच्या योजनांप्रमाणे असेल. म्हणूनच आम्ही विचार, दृष्टीकोनही बदलला आणि त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला.

मित्रहो,

आम्ही आधीच्या पद्धतीप्रमाणे करायचे ठरवले असते तर आधी समिती बनली असती, त्यांच्या बैठका होत राहिल्या असत्या, वेगवेगळ्या संबंधीतांशी चर्चा होत राहिली असती आणि नियोजित वेळेत आपण उद्दिष्ट गाठूच शकलो नसतो. मात्र आम्ही समिती ऐवजी तंत्रज्ञान युक्त दृष्टिकोनावर विश्वास ठेवला.

डाटा इंटेलिजन्सच्या मदतीने, सध्या अस्तित्वात असलेली 17 हजार एलपीजी वितरक केंद्रे आम्ही प्रथम निश्चित केली. त्यानंतर 10 हजार नवी केंद्रे अतिशय कमी काळात तयार केली. त्यासाठी आम्ही देशातले प्रत्येक गाव डिजिटली म्याप केले.

हा डेटा, सेल रिपोर्ट, लोकसंख्या, सामाजिक- आर्थिक स्थिती, यासारख्या दुसऱ्या डेटा पॉइंट वरून विश्लेषण केले.

लाखो गावांमधून सुमारे 64 लाख डायवर्स डेटा पॉइंटच्या विश्लेषणावरून, हे निश्चित करण्यात आले की वितरण केंद्र कुठे-कुठे झाली पाहिजेत. मात्र आमचे काम इथेच संपले नाही. आणखी एक समस्या होती ज्यावर तंत्रज्ञानाने उपाय शोधता आला.

डेशबोर्ड वर अर्ज आणि वितरण यांच्या रिअल टाइम मॉनीटरिंगच्या वेळी समजले की अनेक महिलांचे अर्ज नाकारले जात आहेत कारण त्यांचे बँक खातेच नव्हते.

यावर उपाय म्हणू जन-धन कॅम्प लावले गेले आणि अशा महिलांचे बँक खाते उघडले गेले.

याचा परिणाम म्हणून 3 वर्षात 8 कोटी जोडण्या देण्याचे आम्ही जे उद्दिष्ट ठेवले होते ते नियोजित वेळेआधीच पूर्ण झाले.

मित्रहो,

तंत्रज्ञानाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची व्याप्ती वाढवण्याची ही बाब आहे,यामुळे वर्तनात्मक बदल आणण्यात तंत्रज्ञानाची काय भूमिका असते याचे उदाहरण देतो. देशातल्या आरोग्य स्थितीवर आपल्या पुस्तकात नजर टाकली आहे. विशेष करून गरिबीमुळे उपचार न करण्याची जी मानसिकता देशात आहे ती पैसे नसल्यामुळे आहे.

मित्रहो,

ही परिस्थिती बदलण्यात आयुष्यमान भारत योजना महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पहिल्यांदा जो गरीब, पैशाच्या चिंतेमुळे उपचार करण्यासाठी मागे राहत होता तो आता रुग्णालयापर्यंत पोहोचू लागला आहे. खाजगी रुग्णालया पर्यंत जाण्यासाठीही मागे राहणाऱ्या गरिबाला आता तिथपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.

आज अशी परिस्थिती आहे की गरिबांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. वैद्यकीय सेवांसाठी मागणी वाढली आहे, गरिबांना उपचारही मिळत आहेत आणि रुग्णालयांना सरकारकडून पैसाही मिळत आहे. हे शक्य होत आहे ते केवळ तंत्रज्ञाचा माध्यमातून.

मित्रहो,

या तंत्रज्ञानामुळे आयुष्यमान भारत ही संपूर्ण आरोग्य सेवा म्हणून आम्ही विकसित करत आहोत.

याआधी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर लक्ष दिले जात नव्हते. प्राथमिक आरोग्य सेवा केवळ पोटदुखी आणि डोकेदुखी यापुरतीच सीमित होती.

आता संपूर्ण देशात दीड लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर विकसित करण्यात येत आहेत, त्यांना टेरिटरी आरोग्य सेवा म्हणून विकसित करण्यात येत आहे.

अल्पावधीत आतापर्यंत 21 हजारपेक्षा जास्त अशी केंद्रे तयार झाली आहेत.

हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की इतक्या कमी वेळात या केंद्रांवर दीड कोटींपेक्षा जास्त लोकांना, उच्च रक्तदाब, सव्वा कोटींपेक्षा जास्त जणांना मधुमेह, दीड कोटींपेक्षा जास्त कर्करोगाच्या प्रकरणाचे निदान झाले आहे.

पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर हे शक्य नव्हते.आता हेल्थ अँड वेलनेस सेंटर वरून अशी प्रकरणे पुढे तपासासाठी पाठवण्यात येतात. टेरिटरी आरोग्य सेवा नेटवर्क मध्ये तिथल्या माहितीच्या आधारावर थेट आणि जलद इलाज शक्य व्हायला सुरवात झाली आहे.

मित्रहो,

तंत्रज्ञान जेव्हा सेतू बनते तेव्हा आपल्याला पारदर्शकता आणि नियोजित सेवा प्रदान करण्याचेही समाधान लाभते. भारतात दलाल आणि मध्यस्थाची काय भूमिका होती याच्याशी आपण परिचित होतात.

सरकार देश चालवते

मध्यस्थ प्रशासन चालवतात असा जणू नियमच मानण्यात येत होता.जनता आणि प्रक्रिया यांच्यात अंतर असल्यामुळे हे होत होते. जन्मापासून ते मृत्यु पर्यंतच्या प्रमाणपत्रासाठी दीर्घ व्यवस्था होती, ज्यात सामान्य माणूस भरडला जात होता.

आज जन्म दाखल्यापासून ते जीवन प्रमाणपत्रापर्यंत शेकडो सरकारी सेवा ऑन लाइन आहेत.आज स्व प्रमाणन देशात मान्य होत आहे.आता स्व मूल्यांकन, व्यक्ती निरपेक्ष कर मूल्यांकन या व्यवस्थेकडे आपण वाटचाल करत आहोत.

मित्रहो,

तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग, आव्हानांचे संधीत रूपांतर कसे घडवते याचे आणखी एक उदाहरण आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक, देशाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. मोबाइल आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे आपल्या टपाल सेवेवर ठप्प होण्याचे संकट आले होते, लाखो लोकांच्या रोजगारीवर संकट आले होते. मात्र आज तंत्रज्ञानाच्यामुळेच टपाल कार्यालये ही बँकिंग सेवा,डिजिटल व्यवहारांच्या घरपोच सेवेची केंद्रे ठरली आहेत.

याच प्रमाणे, गावा- गावात ऑन लाइन सेवा देणारे, कॉमन सर्व्हिस सेंटर नेटवर्क 12 लाखाहून अधिक युवकांना रोजगार देत आहे.

मित्रहो,

उद्योजकतेसाठी प्रेरणा, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उदयीग मजबूत करण्यासाठी, त्यांना रोजगार निर्मितीचे महत्वाचे केंद्र बनवण्यासाठी या पुस्तकात जे उपाय सुचवण्यात आले आहेत त्यांच्याशी मी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे.इथे येणारी एक समस्या दूर करण्यासाठीही आम्ही तंत्रज्ञानाचा व्यापक उपयोग करत आहोत. सार्वजनिक क्षेत्रासाठी खरेदीकरिता गव्हरमेंट ई मार्केट प्लेस म्हणजे Ge M बाबत आपल्याला माहिती आहेच. सरकारकडून असलेली मागणी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाची पुरवठा यंत्रणा यांच्यामधला हा सेतू आहे.

या वर्षी या माध्यमातून सुमारे 50 हजार कोटी रुपयांची खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यावरूनच ही यंत्रणा किती यशस्वी ठरली आहे याचा अंदाज येऊ शकतो.

मित्रहो,

याच प्रमाणे, स्टार्ट अप इंडिया, स्थानिक मागणी आणि पुरवठा तर मेक इन इंडिया, स्थानिक पुरवठा आणि जागतिक मागणी यांच्यातला सेतू ठरत आहे.

आपण या पुस्तकात, मागणी आणि पुरवठा यांच्यातल्या समस्यांवर,सखोल विश्लेषण केले आहे. स्टार्ट अप इंडियाची याच समस्यांवर तोडगा काढत आहे.

भारतासमोर जी आव्हाने आहेत, ती समोर ठेवून कल्पकतेला वास्तवाची जोड देऊन उद्योगात परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न आहे. याच कारणास्तव, आज जास्त स्टार्ट अप दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरात तयार होत आहेत.

मित्रहो,

या सर्व बाबींमध्ये एक गोष्टही खरी आहे ती म्हणजे केवळ तंत्रज्ञान हा सर्व समस्यांवरचा तोडगा असू शकत नाही. मानवी उद्देश आणि योग्य उद्देशही आवश्यक असतो. हीच बाब कृत्रिम बुद्धिमत्तेलाही लागू होते. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे कोणता धोका आहे,रोबो, माणसापेक्षा कधी स्मार्ट होईल यावर चर्चा करण्यापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी उद्देश यांच्यात सेतू कसा निर्माण करता येईल, नव्या मागणी अनुसार, आपली कौशल्ये अधिक दर्जेदार कशी करता येतील,यावर चर्चा झाली पाहिजे.

सांगण्यासाठी खूप आहे पण इतरांना, पुस्तक वाचण्यासाठी वेळ द्यायचा आहे.या उत्तम पुस्तकासाठी, उत्तम प्रयत्नासाठी खूप- खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.

धन्यवाद.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane