Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

ब्रिटनचे  माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी पंतप्रधानांची भेट घेतली


ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नोव्हेंबर 2015 च्या त्यांच्या यशस्वी ब्रिटन दोऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला आणि ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर कार्यरत असताना कॅमरुन यांनी भारत-ब्रिटन संबंध बळकट करण्यासाठी जो वैयक्तिक पाठिंबा आणि योगदान दिले त्याबद्दल मोदींनी कॅमरुन यांचे आभार मानले.

उभय नेत्यांनी द्विपक्षीय हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्दयांवर चर्चा केली.

B.Gokhale/S.Mahatre/Anagha