Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबूबक्र अहमद यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2026

भारताचे ग्रँड मुफ्ती- शेख अबूबक्र अहमद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली. सामाजिक सौहार्द आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी आणि देशभरात शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी ग्रॅन्ड मुफ्ती करत असलेल्या कौतुकास्पद प्रयत्नांची पंतप्रधानांनी विशेष दखल घेतली.

एक्सवरील एका संदेशात पंतप्रधान मोदी म्हणतात :

“भारताचे ग्रँड मुफ्ती- शेख अबूबक्र अहमद साहेब यांच्याशी अतिशय चांगला संवाद झाला. विविध विषयांवर आम्ही विचारांचे आदानप्रदान केले. सामाजिक सौहार्द व बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी आणि शैक्षणिक  सुधारणा करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत.”

@shkaboobacker”

* * *

निलिमा चितळे/जाई वैशंपायन/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai