Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले जागतिक नेत्यांचे आभार


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल जगभरातील नेत्यांचे आभार मानले. जगभरातून प्राप्त झालेल्या अभिनंदनपर संदेशांबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल ‘एक्स’वरील पोस्टद्वारे त्यांचे आभार मानताना म्हटले:

पंतप्रधान शेरिंग तोबगे, आपल्या मनःपूर्वक शुभेच्छांसाठी धन्यवाद. भूतानसोबतच्या आमच्या विशेष आणि दीर्घकाळ टिकलेल्या मैत्रीपूर्ण भागीदारीला आम्ही मनापासून महत्त्व देतो. ही भागीदारी सातत्याने अधिक दृढ आणि बळकट होत आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी दिलेल्या मनःपूर्वक शुभेच्छांबद्दल ‘एक्स’वरील पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले:

राष्ट्राध्यक्ष पेलेग्रिनी, आपल्या मनःपूर्वक शुभेच्छांसाठी धन्यवाद. भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील सर्वसमावेशक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल ‘एक्स’वरील संदेशात म्हटले:

राष्ट्राध्यक्ष मुइज्जू, आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. भारत आणि मालदीवमधील मैत्रीचे बंध अधिकाधिक दृढ होत राहोत.”

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिलेल्या मनःपूर्वक शुभेच्छांबद्दल ‘एक्स’वरील पोस्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानत म्हटले:

आपल्या मनापासून दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, माझे मित्र!”

नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल ‘एक्स’वरील पोस्टद्वारे त्यांचे आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले:

पंतप्रधान बालेन्द्र शाह, आपल्या मनःपूर्वक शुभेच्छांसाठी धन्यवाद. भारत आणि नेपाळमधील बहुआयामी आणि प्राचीन सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कार्य करण्यास कटिबद्ध आहोत, जेणेकरून दोन्ही देशांतील जनतेची समृद्धी आणि कल्याण साधता येईल.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे रबी लामिछाने जी यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल ‘एक्स’वरील संदेशाद्वारे त्यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले:

रबी लामिछाने जी, आपल्या हार्दिक शुभेच्छांसाठी धन्यवाद. भारत आणि नेपाळमधील मैत्रीचे दृढ बंध अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, जेणेकरून दोन्ही देशांच्या प्रगती आणि समृद्धीला चालना मिळेल.”

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]