पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितेने भारतामध्ये जलसंवर्धनासाठीच्या राष्ट्रीय अभियानाकरिता भारत आणि इस्रायलदरम्यान स्वाक्षऱ्या झालेल्या सामंजस्य कराराला आज मंजुरी दिली.
भावी पिढीसाठी जलसंवर्धन करायला यामुळे फायदा होईल.
भारतामध्ये राष्ट्रीय जल संवर्धन मोहिमेची रचना, अंमलबजावणी आणि नियंत्रण करण्यासाठी उभय देश राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य वाढविण्यासाठी कार्य करतील. खालिल उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जलसंधारण मोहिमेवर एकत्रितरित्या काम करण्यासाठी संबंधित मंत्रालयांनी सहमती दर्शवली आहे:
अ. भारतामध्ये राष्ट्रीय विषयसूचीवर जलसंवर्धन
ब. दररोजच्या जीवनात पाणी वाचविण्यासाठी प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहन देणे
क. पाण्याबद्दल जनजागृती करणे
डी. पुर्नवापर, पुनर्भरण आणि पाणी पुनर्वापराचा प्रचार व प्रसार करणे
ई. जलसंवर्धनासाठी संकेतस्थळ, मोबाईल एप्लिकेशन सारख्या डिजिटल साधनांचा विकास करणे .
B.Gokhale/S.Mhatre/Anagha