पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सध्या भारतामध्ये कार्यरत असलेल्या व्हिसा प्रक्रियेच्या मुक्त, सुलभ आणि सुसुत्रतेला आज मंजुरी दिली. तसेच, गृह मंत्रालयाच्या संमतीने आणि विविध लाभधारकांसोबत विचारविनिमय करून गृह मंत्रालयाने व्हिसा योजनेमध्ये वाढीव बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यटन, व्यापार आणि वैद्यकीय उद्देशाने भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना याचा लाभ होईल. यामुळे आर्थिक विकासाला उत्तेजना मिळेल आणि पर्यटन, वैद्यकीय यात्रा, व्यापार यातून उत्पन्न वाढेल अशी आशा आहे.तसेच यामुळे केंद्र सरकारचे, कौशल्य भारत, डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया आणि इतर महात्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी व्हायला मदत होईल. तसेच वर नमूद केलेल्या उचित उद्देशांसाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना भारतात प्रवास करणे यामुळे सुलभ होईल.
पी आई बी. /बी. गोखले / एस .म्हात्रे