Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीयांची सुटका करण्याबद्दल पंतप्रधानांकडून एअर इंडियाची प्रशंसा


कोविड-19 या साथीच्या आजारामुळे परदेशी अडकून पडलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करून त्यांना मायदेशी आणण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर इंडियाची प्रशंसा केली आहे.

“मानवतेने घातलेल्या सादेला आत्यंतिक धैर्याने प्रतिसाद देणाऱ्या या @airindiain तुकडीचा अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे देशभरातील अनेकांकडून कौतुक होत आहे. #IndiaFightsCorona” असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

 ****

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar