पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अन्य देश/आंतरराष्ट्रीय संस्थांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थाबरोबर निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
या संस्था पुढीलप्रमाणे :
I. राष्ट्रीय इक्वडोर निवडणूक परिषद
II. केंद्रीय अल्बानिया निवडणूक आयोग
III. भूतान निवडणूक आयोग
IV. अफगाणिस्तान स्वतंत्र निवडणूक आयोग
V. गिनिया राष्ट्रीय स्वतंत्र निवडणूक आयोग
VI. म्यानमार केंद्रीय निवडणूक आयोग
आणि
VII. द इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट आणि द इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टॉरल असिस्टन्स
या सामंजस्य करारांमध्ये मानक परिच्छेद आणि कलमे यांचा समावेश आहे, प्रामुख्याने निवडणूक प्रक्रियेचा संघटनात्मक आणि तांत्रिक विकास, संस्थागत बळकटी आणि क्षमता निर्मिती, कर्मचारी प्रशिक्षण, नियमित सल्ला मसलत या क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभवाचे आदान-प्रदान यासाठी सहकार्याला प्रोत्साहन देण्याचा समावेश आहे.
B.Gokhale/S.Kane/D.Rane