पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने भारतीय खाद्य महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी लाभदायी असलेल्या पेंशन आणि निवृत्ती पश्चात वैद्यकीय योजनेला सुरु करण्यासाठी आज मंजुरी दिली. यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे सार्वजनिक उपक्रम विभागाने दिली आहेत.
दोन्ही योजनांच्या वार्षिक वित्तीय अंदाज पत्रक हे जवळपास 134.4 कोटी रुपयांचे असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या पातळी एवढे आहे. या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
1) व्याप्ती : 1 डिसेंबर 2008 किंवा त्यानंतर नियुक्त झालेले महामंडळाचे सर्व कर्मचाऱ्यांचा (I, II, III आणि IV या वर्गवारीतील) या योजनेत समावेश होईल.
2) पात्रता : मृत्यू प्रकरण वगळता किमान 15 वर्षे निवृत्तीपूर्वी सेवा होणे आवश्यक आहे.
3) अंमलबजावणीची तारीख : सुधारीत वेतन भत्त्याची परिणामकारक तारीख 1 डिसेंबर 2008
4) नियुक्त्याचा सहभाग : असे कर्मचारी ज्यांची नियुक्ती 1 डिसेंबर 2008 नंतर झालेली आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनाच्या 10 टक्के आणि प्रत्येक महिन्यातील महागाई भत्ता
5) कर्मचाऱ्यांचा सहभाग : मुळ वेतनाच्या 2 टक्के + दर महिन्याचा महागाई भत्ता, कर्मचाऱ्यांचा स्वैच्छिक सहभाग = मुळ वेतनाच्या 25 टक्क्यांपर्यंत + दर महा महागाई भत्ता जाईल.
लाभ : मृत्यू जोखीम आणि निवृत्तीवेतन
या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
1) महामंडळाचे सर्व वर्गीकृत कर्मचारी (I, II, III आणि IV) यामध्ये निवृत्ती कर्मचाऱ्यांचाही समावेश असून, जे चालू वैद्यकीय आरोग्य निवृत्त योजनेचे सभासद आहेत.
2) पात्रता : मृत्यू वगळता निवृत्तीपूर्वी 15 वर्ष महामंडळाची सेवा झालेली असावी.
3) नियुक्त्याचा सहभाग : मुळ वेतनाच्या 3.83 टक्के + 1 एप्रिल 2016ला लागू झालेला महागाई भत्ता
4) कर्मचाऱ्यांचा सहभाग : निवृत्तीच्या वेळी असलेला मुळ वेतन + महागाई भत्ता / सेवा काळामध्ये जर जीवनसाथीदाराचा मृत्यू झाल्यास कमाल जोखीम 10 हजार रुपये
5) व्याप्ती : भारतातील कुठल्याही रुग्णालयात महामंडळातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय वैद्यकीय योजनेचा लाभ घेऊ शकतात.
B.Gokhale/D. Rane