Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय विनोदी लेखक, स्तंभलेखक आणि नाटककार तारक मेहता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय विनोदी लेखक, स्तंभलेखक आणि नाटककार तारक मेहता यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

“सुप्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक तारक मेहता यांना श्रद्धांजली. त्यांनी आयुष्यभर विनोद आणि लेखणीची सोबत सोडली नाही.

मला तारक मेहताजी यांना अनेकदा भेटण्याचे भाग्य लाभले. जेंव्हा त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले, तेव्हा त्यांना भेटण्याची संधी मिळाली.

तारक मेहता यांच्या लिखाणात भारताच्या विविधतेतील एकतेची झलक पहायला मिळते. टप्पू बरोबरच इतर व्यक्तीरेखांनीही लोकांच्या मनात स्थान पटकावले” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar