Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय विमान प्राधिकरण आणि विशाखापट्टणम्‌ पोर्ट ट्रस्ट यांच्यातल्या भूखंड अदलाबदलीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


विशाखापट्टणम्‌ येथे मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी भारतीय विमान प्राधिकरण आणि विशाखापट्टणम्‌ यांच्यात भूखंड अदलाबदलीला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली आहे.

कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉनकोर) लॉजिस्टिक पार्कमुळे बंदराची माल उलाढालीची क्षमता वाढणार असून, एकात्मिक रेल्वे-रस्ते लॉजिस्टिक हब विकसित होणार आहे त्याद्वारे आंध्रप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला आणि व्यापाराला चालना मिळून राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. सुमारे नव्वद एकरावर पसरणाऱ्या या पार्कसाठी 11.45 एकर जमिनीची, भारतीय विमान प्राधिकरण आणि विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट यांच्यात अदलाबदल करण्याची गरज आहे.

N.Chitale/M.Desai