Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय शास्त्रज्ञांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


मूलभूत पदार्थ विज्ञानातील ‘स्पेशल ब्रेक थ्रु प्राईज’ मिळवणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

“भौतिक विज्ञानाच्या शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावून वैज्ञानिक क्षेत्रात अभूतपूर्व कार्य केले आहे. या शोध मोहिमेत सहभागी झालेल्या आणि ‘मूलभूत पदार्थ विज्ञानातील ‘स्पेशल ब्रेक थ्रु प्राईज’ मिळवणाऱ्या भारतीय संशोधकांचे अभिनंदन”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

S. Bedekar /B. Gokhale