Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय सनदी लेखापाल संस्था आणि अफगाणिस्तान व्यावसायिक लेखापाल संघटना यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय सनदी लेखापाल संस्था आणि अफगाणिस्तानच्या व्यावसायिक लेखापाल संघटनेदरम्यान सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या सामंजस्य करारामुळे अफगाणिस्तान लेखा विभागाच्या क्षमता बांधणीसाठी परस्पर सहकार्य उपलब्ध होईल, ज्याद्वारे अफगाणिस्तानात ज्ञानाची देवाणघेवाण, विद्यार्थी आणि सदस्यांचे दोन्ही देशात दौरे, संयुक्त चर्चासत्र, परिषदा इत्यादीतून अफगाणिस्तानमधील माहिती तंत्रज्ञान क्षमता आणि गुणवत्ता विश्वसनीयता वाढवण्यास मदत मिळेल.

उद्दिष्टे

या करारांमुळे विविध क्षेत्रातल्या दोन्ही देशातल्या विद्यार्थी आणि सदस्यांचे उभय देशात दौरे होतील. त्यातून परस्पर सहकार्यातून व्यावसायिक कौशल्ये वाढवण्यास मदत होईल.

लेखा व्यवसायात भारतात होत असलेल्या प्रगतीची माहिती अफगाणिस्तानला मिळू शकेल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम दर्जाच्या लेखा सेवांना प्रोत्साहन मिळेल.

भारतातून मिळालेल्या तज्ञांच्या मदतीने अफगाणिस्तानमध्ये लेखा व्यवसायाचा दर्जा वाढू शकेल.

परिणाम

या करारामुळे अफगाणिस्तानात भारतीय लेखापालांना रोजगार मिळू शकेल. तसेच दोन्ही देशातल्या परस्पर संबंधांना अधिक बळकटी मिळेल.

N.Sapre/R.Aghor/P.Kor