Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय सनदी लेखापाल संस्था आणि दक्षिण आफ्रिकी सनदी लेखापाल संस्था यांच्यातल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय सनदी लेखापाल संस्था आणि दक्षिण आफ्रिकी सनदी लेखापाल संस्था यांच्यातल्या कराराला मंजुरी देण्यात आली.

या करारानुसार दोन्ही संस्थांमध्ये ज्ञान, व्यावसायिक आणि बौध्दीक विकास, दोन्ही संस्थांमधील सदस्यांचे हितसंबंध जपणे आणि लेखा व्यवसायाच्या विकासात मदत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्य केले जाईल.

या करारामुळे भारतीय लेखा व्यावसायिक आणि स्थानिक पातळीवरील लेखा पदव्यांना ओळख मिळेल, यातून दक्षिण आफ्रिकेत भारतातील सनदी लेखापालांना नोकरी/व्यवसाय करण्याची संधी मिळेल. तसेच दोन्ही देशातल्या लेखा संस्थामधले संबंध अधिक दृढ होतील.

***

N.Sapre/R.Aghor/P.Kor