Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय सैन्य दलाच्या पराक्रम आणि शौर्याला पंतप्रधानांचा सलाम


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दिनानिमित्त भारतीय सैनिकांच्या पराक्रम आणि शौर्याला सलाम केला आहे.

भारताचे सैन्य दल हे भारत मातेची शान आहे. सेना दिनानिमित्त देशाच्या सैनिकांच्या साहस, शौर्य आणि पराक्रमाला मी सलाम करतो.

आपले सैन्य शौर्यासाठी ओळखले जाते. आपले सैन्य मानवतेचाही आदर करते. लोकांना मदतीची गरज असते तेव्हा आपले सैन्य तत्परतेने धाव घेते. आपल्या सैन्य दलाचा अभिमान असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor