पीएम्इंडिया
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आणि अमेरिकेच्या होम लँड सिक्युरिटी डिपार्टमेंट यांच्यात सायबर सुरक्षेबाबत झालेल्या सामंजस्य कराराबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली. 11 जानेवारी 2017 ला, नवी दिल्लीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.
सायबर सुरक्षेबाबत माहितीचे आदान प्रदान आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या करारा मागचा उद्देश आहे.
N.Sapre/N.Chitale/D.Rane