Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि इथिओपिया यांच्यातील ‘माहिती, दळणवळण आणि माध्यम क्षेत्रात सहकार्य’बाबत कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि इथिओपिया यांच्यातील “माहिती, दळणवळण आणि माध्यम क्षेत्रात सहकार्य” बाबत करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.

सर्वसमावेशक विकासासाठी उभय देशांदरम्यान व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच माहितीच्या प्रसारासाठी माहिती, दळणवळण आणि माध्यम क्षेत्राच्या वाढत्या सामर्थ्याचा लाभ उठवणे हे उद्दिष्ट आहे. आदान-प्रदान कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमधील संपर्क वाढायलाही यामुळे मदत होईल. तसेच माहिती, दळणवळण आणि माध्यम क्षेत्रातील सर्वोत्तम आणि नवीन संशोधनाचे आदान-प्रदान करण्याची संधी दोन्ही देशांना मिळेल.

रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही , समाज माध्यमे यांसारख्या माध्यमातून उभय देशांच्या जनतेला अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी या करारामुळे प्रोत्साहन मिळेल आणि जनतेप्रती उत्तरदायित्व निर्माण होईल.

N.Sapre/S.Kane/P.Kor