पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज भारत आणि इस्टोनिया यांच्यात शिक्षा सुनावलेल्या व्यक्तींच्या हस्तांतरणासंदर्भातील कराराला मंजूरी देण्यात आली.
या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर इस्टोनियाच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक आणि भारतात असलेल्या इस्टोनियाच्या नागरिकांचे हस्तांतरण होऊ शकणार आहे. त्यामुळे या कैद्यांना आपली शिल्लक शिक्षा आपल्या देशात पूर्ण करता येणार असून त्यानंतर त्यांचे सामाजिक पुनर्वसन सुलभ होणार आहे.
B.Gokhale/M.Pange/Anagha