पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि कतार यांच्या दरम्यान माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली. उभय देशांमध्ये 1 जानेवारी आणि 12 जानेवारीला करार करण्यात आले होते.
उभय देशांतील सहकार्याच्या करारामुळे माहिती आणि संचार तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात अत्याधुनिक संस्थांची उभारणी करणे शक्य होणार आहे.
S. Bedekar / B. Gokhale