पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, कृषी आणि अन्नधान्य संबंधित उद्योग क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि किरगीजस्तान यांच्यातील करारावर स्वाक्षऱ्या करण्याबाबत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
उभय देशांमधील या प्रस्तावित करारात, संशोधन, पशु पैदास, एव्हियन इन्फ्लुएंझा आणि अन्य रोगांच्या माहिती आणि अनुभवांच्या देवाणघेवाणीसह कृषी आणि संलग्न क्षेत्रातील अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
याशिवाय, वनस्पती प्रजातींच्या हक्काचे संरक्षण, कृषी, अन्नधान्य व्यापार, कृषी संशोधन आणि शिक्षण, अन्न सुरक्षा आदी क्षेत्रात सहकार्याची तरतूद आहे.
उभय देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या संयुक्त कृती गटाची स्थापना करण्याची तरतूद या करारात आहे.
स्वाक्षरी झाल्यानंतर लगेचच हा करार लागू होईल आणि त्याचा कालावधी पाच वर्षांचा असेल.
(B.Gokhale/S.Kane)