Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि कोरिया दरम्यान व्यापार सुधारणा सहकार्यासाठी सामंजस्य कराराला मंत्रीमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारत आणि कोरिया यांच्यातील व्यापार सुधारणा सहकार्य सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.

जुलै 2018 मध्ये कोरिया च्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान हा करार होऊन या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या .

हा सामंजस्य करार दोन्ही देशांमधील व्यापार क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करेल. अँटी -डंपिंग, अनुदान आणि काउंटरबिलिंग आणि त्यावरील उपाय , यामुळे द्विपक्षीय व्यापार संबंधांमध्ये वाढ होईल.

B.Gokhale/P.Malandkar