Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि कोरिया यांच्यातल्या 9 अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यात पत विषयक सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


भारताची एक्झिम बँक आणि कोरियाची एक्झिम बँक यांच्यातल्या, भारतातल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि तिसऱ्या देशातल्या प्रकल्पाचा भाग म्हणून वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी,9अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यात पत विषयक प्रस्तावित सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.

वित्त मंत्री अरुण जेटली वार्षिक द्विपक्षीय चर्चेसाठी येत्या 14 – 15 जूनला कोरियातल्या सेऊलला भेट देणार आहेत त्या वेळी या प्रस्तवित करारावर स्वाक्षऱ्या अपेक्षित आहेत.भारत आणि कोरिया यांच्यातले आर्थिक आणि राजकीय संबंध दृढ होण्याबरोबरच देशाच्या निर्यातीलाही या निर्णयामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.भारतातल्या स्मार्ट सिटी,रेल्वे,ऊर्जा निर्मिती आणि वहन या क्षेत्रासाठी निर्यात पत उपयोगात आणली जाईल.

N.Sapre/N.Chitale/P.Kor