पीएम्इंडिया
भारत आणि कोलंबिया यांच्यात पारंपरिक औषध पद्धती क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
यामुळे कोलंबियामधे भारतीय पारंपारिक औषध पद्धतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
या सामंजस्य करारामुळे प्रशिक्षणासाठी तज्ञांचे आदान-प्रदान, पारंपरिक औषध पद्धतीमध्ये संशोधन सहयोग यातून औषध विकास आणि पारंपरिक औषध क्षेत्रात नाविन्य पूर्ण शोधाना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
N.Sapre/N.Chitale/D.Rane