पीएम्इंडिया
भारत आणि कोलंबिया यांच्यामध्ये कृषी आणि मत्स्योत्पादन क्षेत्रातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या सामंजस्य कराराद्वारे कृषी आणि मत्स्योत्पादन यामध्ये या भागात सहकार्याला वाव मिळणार आहे –
कृषी विपणनासाठी यशस्वी मॉडेल :
बियाणे उत्पादनासाठी कृषी कंपन्यांसमवेत प्रकल्प विकसित करणे
फळे, भाज्या,फुले यासाठी कल्पक उत्पादन मॉडेल आणि मूल्य निर्मिती प्रक्रिया
माहितीचे आदान-प्रदान आणि तज्ज्ञांच्या भेटी
तेल बिया संशोधनात सहकार्य
सागरी औद्योगिक मासेमारी, मासेमारीमध्ये प्रशिक्षण आणि संशोधन प्रशिक्षण
डुक्कर मांस प्रक्रिया आणि मूल्यवर्धन
या सामंजस्य करारांतर्गत येत्या दोन वर्षासाठी या काळात करण्याच्या कामांसहित कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि निश्चित करण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना करण्यात येणार आहे. हा सामंजस्य करार सुरवातीला पाच वर्षासाठी वैध राहील आणि त्यानंतर दोन्ही पक्षांपैकी एखादा पक्ष जोपर्यंत हा करार रद्द करण्याची इच्छा व्यक्त करत नाही तोपर्यंत पुढच्या पाच वर्षासाठी आपोआप हा करार विस्तारित होईल.
N.Sapre/N.Chitale/P.Kor