पीएम्इंडिया
रेल्वे सुरक्षेबाबत जपानबरोबर सहकार्य करण्याच्या कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली.फेब्रुवारी 2017 मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
रेल्वे मार्ग आणि रूळ सुरक्षा,यासंदर्भात अद्ययावत तंत्रज्ञान यासह आणखी काही क्षेत्रात या करारामुळे सहकार्य करायला मदत होणार आहे. तज्ञ् आणि त्यांच्या सल्ल्याचे आदान प्रदान, उत्तम प्रथांच्या माहितीची देवाण घेवाण यामुळे शक्य होणार आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha